Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
मुख्य पान  >> 

विदर्भ


Friday, September 22 AT 06:10 AM (IST)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या पवित्र भूमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळेच संपूर्ण समाज प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकला. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारी आहे. येथे येऊन मी धन्य झालो आहे, अशा शब्दांत आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बाबासाहेबांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
Thursday, September 21 AT 07:00 PM (IST)
नागपूर स्थानकावर होम प्लॅटफॉर्मवर ‘कार टू कोच’ सुविधा आहे मात्र ‘ऑटो टू कोच’ असा नवीनच प्रकार गुरुवारी सकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर पाहायला मिळाला. या प्रकारामुळे रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
Thursday, September 21 AT 07:00 PM (IST)
दीक्षाभूमीचे दर्शन, जैन मंदिरास भेट, विपश्यना केंद्र आणि कविवर्य सुरेश भट सभागृहाचे उद्घाटन अशा भरगच्च कार्यक्रमांसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज, शुक्रवारी सकाळी १० वाजता वायुसेनेच्या विशेष विमानाने येथे आगमन होणार आहे.
Thursday, September 21 AT 07:00 PM (IST)
भाजप नेते व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी गणेशपेठ पोलिसांना शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. तिवारी यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा व्ह‌िडीओ सोमवारी व्हायरल झाला होता. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Thursday, September 21 AT 07:00 PM (IST)
चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकिलांच्या नियुक्त्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी फेटाळून लावली. नियुक्ती संदर्भातील सुधारित नियमांनुसार प्रधान जिल्हा न्यायाधीशांचा अभिप्राय अनिवार्य नसल्याचे निरीक्षण नोंदवित नियुक्ती योग्य असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
Thursday, September 21 AT 07:00 PM (IST)
व्हॉट्स अॅप ग्रुपवरून शिक्षकांना दिल्या जाणा सूचना आणि कामांचे आदेश यांचा विरोध करण्यासाठी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील शिक्षकांनी ऑनलाइन आंदोलनाला प्रारंभ केला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेले व्हॉट्स अॅप ग्रुप सोडून आपला निषेध व्यक्त करण्याचा अभिनव मार्ग न‌िवडला आहे.
Thursday, September 21 AT 07:00 PM (IST)
महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या मतदार संघात महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. त्यासाठी मंत्रालयाने राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना पत्रपाठवत डॉक्टरांची टीम पाठविण्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे या महाआरोग्य शिबिरासाठी सर्व सरकारी मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरांची टीम जळगावला जाणार असल्याने स्थानिक स्तरावरील आरोग्य यंत्रणा प्रभाव‌ित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Thursday, September 21 AT 06:30 PM (IST)
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्याचा शुक्रवार, २२ सप्टेंबर शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित आपले अर्ज सरकार केंद्र, महा ई-सेवा केंद्र व सीएससी केंद्रावर भरावेत. तसेच कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकाकडील शेती कर्जाची माहिती द्यावी.
Thursday, September 21 AT 06:30 PM (IST)
मोताळा पंचायत समितीमध्ये कित्येक दिवसांपासून डाटा एंट्री ऑपरेटर नसल्याने नागरिकांची कामे होत नसल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या भाजपचे पंचायत समिती सदस्य धीरजेंद्रसिंह उर्फ रावसाहेब देशमुख यांनी गटविकास अधिकारी तथा सभापतींच्या कार्यालयातील फर्निचरची तोडफोड केली. तसेच कार्यालयातील साहित्य बाहेर फेकून दिल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडला.
Thursday, September 21 AT 06:30 PM (IST)
ढगांचे सावट व खराब हवामानामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नागपुरातील हवाई दौरा रद्द झाला आहे. आता ते रस्तेमार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते दीक्षाभूमी, दीक्षाभूमी ते रामटेक असा प्रवास करतील. रामटेक येथून ते कामठी, कामठीतील ड्रॅगन पॅलेस येथे येतील. तेथून ते राजभवन येथे येतील. येथे काही काळ विश्रांती केल्यानंतर कोविंद हे रेशीमबागेतील भट सभागृह येथे जातील.
Thursday, September 21 AT 06:30 PM (IST)
एखादी व्हीआयपी व्यक्ती शहरात येते, त्यांचा ताफा जाईपर्यंत वाहतूक अडवून ठेवली जाते, तोवर अनेकांना ताटकळत उभे रहावे लागते. अलीकडे नागपुरात व्हीआयपींची संख्या वाढल्याने असे ताटकळण्याचे अनुभव वारंवार येतात. आज असाच काहीसा ताटकळण्याचा अनुभव घेण्याची वेळ आली ती राज्यपाल विद्यासागर राव यांच्यावर! त्यांचे विमान वेळेच्या आधीच पोहचले, ते आले तेव्हा एकही अधिकारी विमानतळावर नव्हते आणि एकच गोंधळ उडाला.
Thursday, September 21 AT 06:30 PM (IST)
गेल्या काही महिन्यांत राठेगाव तालुक्यात ८ जणांचा फडशा पाडणाऱ्या नरभक्षक वाघाने दोन दिवसांपूर्वी सखी गावातील १९ वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला ठार केले. या घटनांमुळे प्रचंड जनक्षोभ उसळला असतानाच गुरुवारी दुपारी कळंब तालुक्यातील नाझा या गावाजवळ वाघाने शेतकऱ्यांवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. बाबाराव कवडुजी आडे (वय ५५) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. वाघाने हल्ला करताच बाबाराव यांनी वाघाशी झटापट करीत आरडाओरड केली.
Thursday, September 21 AT 06:30 PM (IST)
भूमाफिया दिलीप शिवदास ग्वालबंशी आणि त्याची पत्नी शुभांगी ग्वालबंशी यांच्या नावे असलेली सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेश महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचे (मोक्का) विशेष न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने दिले आहेत. ग्वालबंशी दाम्पत्याची संपत्ती मोक्काच्या कलम २० (२)अंतर्गत जप्त करण्याची परवानगी मागणारा अर्ज या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांनी न्यायालयाला केला होता.
Thursday, September 21 AT 06:30 PM (IST)
आदिशक्तीचे प्रतीक म्हणून नवरात्रोत्सवात स्त्रीशक्तीचा जागर घडविला जातो. मात्र या उत्सवावर सध्या स्वाइन फ्लूने मृत्यूची शोककळा पसरविली आहे. अवघ्या तीन दिवसांत या आजाराने आणखी एकूण १० जणांचा मृत्यू ओढवला आहे. त्यापैकी सहा महिलांचा समावेश आहे. दुःखाची बाब म्हणजे स्वाइनची लागण झाल्याने दगावलेल्यांमध्ये अवघ्या सहावर्षांच्या एका चिमुकलीचा समावेश आहे.
Thursday, September 21 AT 06:30 PM (IST)
ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर या मार्गांवर मेट्रोच्या कामासाठी रस्त्यांवरील जागा घेण्यात आल्याने अर्ध्या रस्त्यांवरूनच आता नागरिकांना वाट काढावी लागत आहे. मात्र, या उर्वरित मार्गांवरही खड्डेच असल्याने आम्ही प्रवास करायचा कुठून, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे. सर्वाधिक खड्डे हिंगणा मार्गावर असल्याने या ठिकाणी दुर्घटना होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.
Thursday, September 21 AT 06:30 PM (IST)
मागील १४ वर्षांपासून राज्यातील कला विभागाला पूर्ण वेळ संचालक न देण्याचा प्रघात पुन्हा एकदा कायम राहिला आहे. या पदाकरिता पात्र असलेल्यांच्या मुलाखती घेऊनही हे पद यंदाही भरण्यात आलेले नाही. या प्रकारामुळे राज्यातील कला प्राध्यापक संतप्त झाले असून, कला शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
Thursday, September 21 AT 06:30 PM (IST)
येथील डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को. ऑपरेटीव्ह बँकेचे अध्यक्ष संजय महादेवराव वानखडे (वय ५६) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. बँकेच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे झटत असताना वर्धा येथील एका व्यावसायिकाने बँकेस फसविल्याच्या प्रकरणामुळे व्यथित झाल्याने आत्महत्या केल्याचे वानखडे यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून उघड झाले आहे.
Wednesday, September 20 AT 11:30 PM (IST)
डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष प्रा. संजय वानखडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. अमरावतीतील रुक्मिणीनगर परिसरात समर्थ कॉलनीत राहत्या घरी ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकलेले नाही, मात्र पोलिसांना त्यांची सुसाईड नोट मिळाली आहे. बँकेच्या आर्थिक अनियमिततेचे कारण या आत्महत्येमागे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Wednesday, September 20 AT 08:35 PM (IST)
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नागपूर महापालिकेला नोटिस बजावली. रेशीमबागेतील स्मृतिमंदिर परिसराभोवती संरक्षण भिंत व ​आतील भागात सिमेंट रस्ते बांधकामप्रकरणी नागरी हक्क संरक्षण मंचाचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी ही याचिका दाखल केली. याचिकेत १.३७ कोटी रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या विकासकामांना विरोध दर्शविण्यात आला आहे. याप्रकरणी ३ ऑक्टोबरपर्यंत रास्व संघ आणि मनपाला न्यायालयात शपथपत्र सादर करावयाचे आहे.
Wednesday, September 20 AT 08:31 PM (IST)
गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने राज्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरली असून, अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या भागांत पाणी ओसंडून वाहत आहे. पावसाच्या लहरीपणाने विदर्भाची मात्र चिंता वाढविली आहे. विदर्भातील आठ जिल्हे ‘कोरडे’ आहेत. गेल्या तीन दिवसांतील पावसामुळे तूट २३ टक्क्यांवर आली असली तरी स्थिती चिंताजनकच आहे. मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. वसई आणि पालघर भागाला जबर फटका बसला आहे.
Wednesday, September 20 AT 07:00 PM (IST)
डोळे दिपवून टाकणाऱ्या राज्यातील सर्वाधिक क्षमतेच्या रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहाचे शुक्रवार, २२ सप्टेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लोकार्पण होत असल्याची माहिती महापौर नंदा ​जिचकार यांनी पत्रपरिषदेत दिली. या प्रेक्षागृहाचे बाह्य व अंतरंग अत्यंत सुंदर व कल्पक असून, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना ठरेल असाच आहे. दुपारी ४.१५ वाजता हा कार्यक्रम होईल.
Wednesday, September 20 AT 06:30 PM (IST)
केंद्र सरकारचे कुठलेही आदेश नसताना ओबीसींच्या शिष्यवृत्ती ५० टक्क कपात केली. हा समाजावरचा अन्याय आहे. म्हणून ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती तत्काळ देण्यात यावी अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघ, गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवा संघाच्यावतीने निवेदनातून देण्यात आला आहे. गोंदिया, भंडारा गडचिरोली व चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी हे निवेदन देण्यात आले आहे.
Wednesday, September 20 AT 06:30 PM (IST)
९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रमाची निवड झाली. अंनिसने आक्षेप घेतला आणि दावे-प्रतिदावे रंगले. आता संमेलनाच्या आयोजनातून आश्रमाने स्वत:हून माघार घेतली. आता संमेलन बडोद्यात होणार आहे. मात्र या वादात वऱ्हाडाचे साहित्यिक आणि पर्यटनदृष्ट्या नुकसान झाल्याची खंत व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावरही याविषयीच्या पोस्ट फिरू लागल्या आहेत.
Wednesday, September 20 AT 06:30 PM (IST)
एकीकडे एअर चायना कंपनीच्या मोठ्या विमानाच्या हवेत घिरट्या आणि त्याचवेळी बँकॉक एअरवेजच्या विमानाचे लॅण्डिंग, असा आगळा थरार नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मध्यरात्री घडत होता.
Wednesday, September 20 AT 06:30 PM (IST)
ब्रह्मपुरीहून पकडून आणलेल्या आणि बोर अभयारण्यात सोडलेल्या वाघिणीने आष्टी तालुक्यातील वडाळा (वर्धपूर) शिवारात हल्ला करून पुन्हा एका शेतकऱ्याचा जीव घेतला. ही वाघीण नरभक्षक नसल्याचा दावा करीत वन विभागाने तिला खुल्या जंगलात सोडले होते. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास विरोध दर्शविला. सोबतच वनविभागाच्या गाडीला पेटवून देत रोष व्यक्त केला. तणाव निर्माण झाल्याने गावात अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.