Updated:
Subscribe Newsletter Invite Friends

 
  Search Tag:    Section:  
 
  From Date:    To Date:   
Total Results: 1
बुकगंगा प्रकाशित आणि नीतीन मोरे लिखित 'एकांताच्या वादळवेळा' ह्या पुस्तकाचे प्रकाशन...!!! "बुकगंगा प्रकाशित" आणि "नीतीन मोरे" लिखित "एकांताच्या वादळवेळा" या काव्यसंग्रहाचं प्रकाशन ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ व समीक्षक डाॅ रमेश धोंगडे यांच्या हस्ते १२ नोव्हेंबरला पुण्यात झालं. यावेळी मंचावर डाॅ धोंगडे, बुकगंगाच्या संचालिका सुप्रिया लिमये, मकरंद दातार आणि सुवर्णा बर्वे उपस्थित होत्या. आपल्या मनोगतात कवितासंग्रह विकले जात नाहीत याबद्दल खंत व्यक्त करताना नीतीन मोरे यांनी प्रकाशक म्हणून पाठराखण केल्याबद्दल बुकगंगाचे आभार मानले. "कविता हा माझा प्राण आहे. कवितेइतकं सहज आणि सरळ मला इतर काहीही करता येत नाही," असं ते म्हणाले. सुप्रिया लिमयेंनी प्रकाशकांतर्फे मनोगत मांडलं. मोरे यांच्या "कवितासंग्रह विकले जात नाहीत" या मुद्दयाला खोडून काढत त्यांनी त्यांच्या "एकलकोंड्याचा कबिला" या पहिल्या काव्यसंग्रहाला बुकगंगावर चांगला प्रतिसाद असल्याचं सांगितलं. डाॅ धोंगड्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात कविता आणि गीत या आकृतिबंधांची तुलना करत कवितेचं वेगळेपण विशद केलं.

Tuesday, November 15, 2016 AT 08:26 PM (IST)