Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
मुख्य पान  >> 

संपादकीय


Thursday, September 21 AT 05:21 PM (IST)
मुंबईत पावसाने थैमान घातले असतानाच मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान धावपट्टीवरून घसरल्याने २५ तास जो काही हलकल्लोळ माजला तो देशाच्या प्रतिमेस तर शोभेसा नव्हताच पण जगभरात जाणाऱ्या आणि भारतात येणाऱ्या हजारो प्रवाशांचे अनन्वित हाल करणारा होता.
Wednesday, September 20 AT 06:30 PM (IST)
विदर्भात पावसाचा जोर कमी असला, तरी बाकी सगळीकडे तुफान पाऊस पडल्यामुळे धरणे भरून वाहू लागली आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने जलयुक्त महाराष्ट्राचे दर्शन घडते आहे.
Wednesday, September 20 AT 06:30 PM (IST)
मोबाइल फोन संभाषणाच्या वेळेस आकारण्यात येणाऱ्या इंटरकनेक्ट शुल्कामध्ये कपात करण्याचा दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) निर्णयामुळे देशातील मोबाइल क्षेत्र पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.
Tuesday, September 19 AT 06:30 PM (IST)
मुंबई, पुणे, नाशिक या विकासाच्या सुवर्ण त्रिकोणाविषयी मध्यंतरी बरेच बोलले, लिहिले गेले. त्यातील विकासाचे काय झाले, हा संशोधनाचा विषय असला तरी सध्या हा त्रिकोण साथीच्या आजाराने मात्र सारखाच त्रस्त आहे.
Tuesday, September 19 AT 06:30 PM (IST)
`रोज मरे त्याला कोण रडे’, अशी मराठीत म्हण आहे. शिवसेनेच्या आमदारांची अवस्थाही सध्या तशीच झालेली आहे.
Monday, September 18 AT 06:30 PM (IST)
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६३ मध्ये भाक्रा-नांगल धरणप्रकल्प राष्ट्रापर्ण केला तेव्हा ‘ही आधुनिक भारताची मंदिरे आणि आपल्या प्रगतीची प्रसादचिन्हे आहेत,’ असे गौरवोद्‍गार काढले होते. हा प्रकल्प पुरा होण्याआधी पाच एप्रिल १९६१ रोजी पंडितजींनी सरदार सरोवर प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर, ५६ वर्षांनी अखेर हा महाप्रकल्प पुरा झाला आहे.
Monday, September 18 AT 06:30 PM (IST)
महाराष्ट्रातील कसलीही अप्रिय आकडेवारी पुढे केली की नोकरशाही व सरकारचे ठरलेले उत्तर असते. ‘देशाच्या सरासरीकडे पाहा. आपण कितीतरी पुढे आहोत.’ महाराष्ट्रात आज दर हजारातली २१ अर्भके पाचवा वाढदिवस पाहू शकत नाहीत. देशाची ही सरासरी ३७ आहे. ती कोणत्या राज्यांमुळे वाढते, हे सारे जाणतात. पण राज्य सरकार केरळचे उदाहरण डोळ्यांसमोर का ठेवत नाही? तेथे जन्म घेणाऱ्या दर हजार बाळांमधील केवळ सहांचा अपमृत्यू होतो. हे प्रमाण अमेरिकेइतकेच आहे.
Sunday, September 17 AT 06:30 PM (IST)
भारतीय वायूदलाचे मार्शल अर्जन सिंह यांच्या निधनामुळे पाकिस्तानविरुद्ध जिंकलेल्या १९६५ च्या युद्धाचा महानायक काळाच्या पडद्याआड गेला आहे.
Sunday, September 17 AT 06:30 PM (IST)
आता तरी याबाबत संपूर्ण महाराष्ट्राने गंभीर होऊन या कारवाईला पाठिंबा देण्याची गरज आहे. अन्यथा पुढच्या पिढ्या आपल्याला प्लास्टिकच्या अतिरेकाबद्दल माफ करणार नाहीत.
Friday, September 15 AT 02:23 PM (IST)
दिवंगत शुकदासांवरील शंकेने अखेर हिवरा आश्रमातील साहित्य संमेलनाचा मार्ग रोखला. ‘विवेकानंद आश्रमा’ची माघार अनपेक्षित होती, असे नाही. अनेक संभाव्य वादांना त्यातून पूर्णविराम मिळाला.
Friday, September 15 AT 02:22 PM (IST)
देशात महागाईने गेल्या चार महिन्यांतील उच्चांक गाठल्याने इंधन दरवाढीच्या चटक्यातून वाचू पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आता खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी संघर्ष करावा लागत आहे.
Thursday, September 14 AT 03:09 PM (IST)
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा धसका घेत राज्य सरकारने ३४ हजार कोटी रुपयांची कृषी कर्जमाफी करण्याची घोषणा तर केली. मात्र, आता इतके पैसे आणायचे कुठून हा भलामोठा प्रश्न त्यांच्यासमोर दत्त म्हणून उभा झाला आहे आणि छळू लागला आहे.
Thursday, September 14 AT 03:07 PM (IST)
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरत असूनही आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत होत असतानाही इंधनाच्या दरांत सातत्याने वाढ होणे ही जनतेची लूटमार आहे.
Wednesday, September 13 AT 04:00 PM (IST)
चांगला पाऊस झालेला असताना आणि धरणे तुडुंब भरून वाहत असतानाही पुणेकरांना पाणीवापरावरून जलसंपदा विभागाने सल्ला दिल्याने वादाला तोंड फुटले आहे. मुबलक पाणीसाठा असूनही पुणेकरांवर टंचाईची टांगती तलवार आहे, तर ऐन पावसाळ्यात राज्याच्या काही जिल्ह्यांत पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावतो आहे. चार किंवा पाच दिवसांआड पाणी पुरविण्याचा प्रकार तर राज्याच्या बहुतेक शहरांत आता सर्रास सुरू आहे.
Wednesday, September 13 AT 03:30 PM (IST)
अमेरिकेतील बर्कले येथील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसमोर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेली मांडणी अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.
Tuesday, September 12 AT 03:58 PM (IST)
आजच्या ज्येष्ठ नागरिकांना ‘शाळेला जाताना मज विघ्ने येती नाना..’ अशी लयदार कविता होती. शाळेत जाताना अनेक मोह या मुलाची वाट अडवतात, अशी कृतक तक्रारीची ही गोड कविता आहे. काही दशकांनी पुलाखालून इतके पाणी वाहून गेले आहे की, आईबापांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिल्लांना शाळेत जाताना विघ्ने, शाळेतून येताना विघ्ने, शाळेतली विघ्ने आणि कधी कधी तर खुद्द शाळा हेच विघ्न इतकी परिस्थिती खालावली आहे.
Tuesday, September 12 AT 03:55 PM (IST)
राज्यात गाजत असलेल्या सत्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याच्या तपासामधील प्रगती कासवाच्या गतीने सुरू आहे. वास्तविक एवढ्या मोठ्या गैरव्यवहाराची आवई उठवून भारतीय जनता पक्षाने गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता हस्तगत केली. त्यामुळे या सर्वच प्रकरणाची तपासणी वेगाने होणे अपेक्षित होते.
Monday, September 11 AT 02:45 PM (IST)
‘धार्मिक कट्टरवादाच्या भयानक राक्षसाने मागील अनेक वर्षे पृथ्वीवर राज्य केले. या विश्व धर्म संमेलनातील संकल्पाने सर्व प्रकारच्या धर्मांधतेचा तसेच तलवार वा लेखणीद्वारे होणाऱ्या सर्व अत्याचारांचा आणि परस्परकटुतेचा अंत होईल, अशी मला आशा आहे...’ शिकागोच्या विश्व धर्म संमेलनात स्वामी विवेकानंदांनी केलेले हे भाषण जगभर गाजले.
Monday, September 11 AT 02:43 PM (IST)
बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम या खेड्यामध्ये पुढील वर्षीचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, साहित्य संमेलने आणि वाद या दीर्घकाळ रुजलेल्या समीकरणाला अनुसरून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व संघटक श्याम मानव यांनी नूतन संमेलनस्थळाबद्दल आक्षेप घेऊन वाद निर्माण केला आहे.
Thursday, September 07 AT 03:14 PM (IST)
देशातील रस्त्यांवर दर तासाला सरासरी ५५ अपघात होतात आणि त्यांमध्ये सतरा जणांचा मृत्यू होतो. याचाच अर्थ एका दिवसाला सरासरी चारशे लोक अपघातात मृत्युमुखी पडतात
Thursday, September 07 AT 03:13 PM (IST)
एखादी जुनी जखम पुन्हा पुन्हा चिघळावी आणि पुन्हा पुन्हा त्यावर कुणीतरी फुंकर घालावी, तसेच मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचे झाले आहे.
Tuesday, September 05 AT 05:19 PM (IST)
गोरखपूरच्या ऑक्सिजनने अनेकांचे प्राण कंठाशी आणले. व्यवस्थेतील गलथानपणा किती टोक गाठू शकतो याचे निर्मम उदाहरण त्या घटनेने सर्वांपुढे ठेवले. कुणाचेही जीव असे हकनाक जात असतील तर ती वेदना समाजात झिरपायलाच हवी.
Tuesday, September 05 AT 05:15 PM (IST)
देशभर सरकारी शिक्षक दिनाचा माहोल आहे. शिक्षकांसाठीचा हा उत्सवी दिवस आहे आणि त्याचा उत्साह मोठा असतो. परंतु यंदाचा शिक्षक दिन साजरा होत असताना राज्यातील शिक्षकांमध्ये उत्सवी वातावरणाऐवजी चिंतेचे ढगच दाटून आल्याचे चित्र होते.
Monday, September 04 AT 04:30 PM (IST)
एनडीएमधील घटकपक्षांना सामावून घेण्यासाठी, अकार्यक्षम मंत्र्यांना वगळण्यासाठी आणि २०१९च्या निवडणुकीआधी गतीने काम करण्यासाठी अशी अनेक कारणे सांगण्यात येत होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार झाल्यानंतर यापैकी कोणतेही कारण विस्तार करताना विचारात घेतल्याचे दिसत नाही.
Monday, September 04 AT 04:30 PM (IST)
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या बाद केलेल्या नोटांपैकी ९९ टक्के नोटा परत आल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केल्यानंतर नोटाबंदीच्या फलश्रुतीचा विषय पुन्हा ऐरणीवर आलेला असताना, या मध्यवर्ती बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मौन सोडले आहे.