Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
Tuesday, September 19 AT 06:55 PM (IST)
जिल्ह्यामध्ये अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचीच ताकद असल्याचे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सदस्यपद निवडणुकीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले. ‘डीपीसी’च्या ४० सदस्यांपैकी ३४ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागा खेचून आणल्या, तर एक जागा अपक्षाला मिळाली. त्यामुळे ‘डीपीसी’मध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यांची संख्या २१वर तर, भाजपच्या सदस्यांची संख्या १४वर पोहोचली आहे.
Tuesday, September 19 AT 06:52 PM (IST)
शाळा आणि परिसरात तसेच स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही बसवा आणि त्याचे बॅकअप सहा महिन्यांपर्यत ठेवा. ते चित्रीकरण तपासा, शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन करा आणि शाळेचे सुरक्षा ऑडिट करून घ्या, अशा विविध सूचना पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना मंगळवारी दिल्या. पोलिस विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी आहेत. शाळेत विद्यार्थी असुरक्षित असतील तर, तो गुन्हा आहे.
Tuesday, September 19 AT 06:50 PM (IST)
एकांकिका स्पर्धा म्हणजे महाविद्यालयीन तरुणांच्या विविध कलागुणांनी भारलेलं वातावरण... तरुणांच्या सहभागाचा उत्साहही वाखाणण्याजोगाच... मात्र, सध्या सुरू असलेल्या विनोदोत्तम करंडक स्पर्धेमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळाले. चक्क ७७ ‍वर्षांच्या आजींनी रंगमंचावर एंट्री घेतली आणि ‘पाहुणचार’ या एकांकिकेत ‘वहिनी’ची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या.
Tuesday, September 19 AT 06:48 PM (IST)
येरवडा येथील रामवाडी पुलाखाली वाहतूक कोंडी होऊनही एकजण विरुद्ध दिशेने येत आला. त्याला एकाने जाब विचारल्यामुळे त्याने साथीदारांना बोलवून संबंधित तरुणाला लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. तसेच, त्याच्याजवळचा मौल्यवान ऐवज चोरून नेला. त्या वेळी नागरिकांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर मारहाण करणाऱ्याच्या तीन अन्य साथीदारांना येरवडा पोलिसांनी अटक केली.
Tuesday, September 19 AT 06:46 PM (IST)
समान पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेमधून १२५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला. राज्य सरकारने दिलेल्या मंजुरीमुळे पालिकेला दिलासा मिळाला आहे.
Tuesday, September 19 AT 06:41 PM (IST)
वाढते ताणतणाव, बैठे काम, वेळीअवेळी जेवण अशा ‘आधुनिक’ जीवनशैलीचा फटका पुणेकरांना बसला आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात लठ्ठपणामध्ये राज्यात पुणेकरांनी पहिला क्रमांक ‘पटकावला’ आहे. पुणेकरांपाठोपाठ मुंबईकरांनी दुसरे स्थान मिळवले आहे. पुरुषांसमवेत महिलांमध्येही लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असल्याचे या पाहणीत समोर आले आहे.
Tuesday, September 19 AT 06:39 PM (IST)
हडपसर-रामटेकडीतील कचरा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधकांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत आंदोलनाचा पवित्रा घेऊन काम बंद करण्याची मागणी केली. महापौर मुक्ता टिळक यांनी हे काम तूर्त बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर विरोधकांनी आंदोलन मागे घेतले.
Tuesday, September 19 AT 06:36 PM (IST)
कोर्टाच्या कामांसाठी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मनाप्रमाणे वागता यावे यासाठी कैदी तुरुंगातील पोलिसांसोबत अर्थपूर्ण व्यवहार करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पोलिसांकरवी कैद्यांची नातेवाइक, साथीदारांची भेट घडवून आणली जात असल्याचे वृत्त आहे.
Tuesday, September 19 AT 05:30 PM (IST)
कोथरूड येथील नियोजित जागेवर शिवसृष्टी आणि मेट्रो स्टेशन हे दोन्ही प्रकल्प करणे शक्य आहे, अशी सकारात्मक चर्चा मुंबई येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत झाली.
Tuesday, September 19 AT 05:30 PM (IST)
रिझर्व्ह बँकेने लोकसेवा सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे या बँकेला आता कोणतेही बँकिंग व्यवहार करता येणार नाहीत. या बँकेवर अवसायक (लिक्विडेटर) नेमण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने सहकार विभागाला दिले आहेत.अनुत्पादक कर्जांचे (एनपीए) प्रमाण वाढल्यामुळे या बँकेवर २०१४ मध्ये आर्थिक निर्बंध लागू करण्यात आले. मनसेचे माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या नेतृत्वाखालील ही बँक होती.
Tuesday, September 19 AT 04:44 PM (IST)
‘शिवसृष्टी आणि मेट्रो स्टेशन हे दोन्ही प्रकल्प शहरासाठी महत्त्वपूर्ण असल्याने उपलब्ध जागेमध्ये हे प्रकल्प करण्याचा आराखडा करावा. शेजारील बीडीपीची जागा ताब्यात घेऊन त्याचा टीडीआर देण्याचा पर्याय आहे.
Tuesday, September 19 AT 04:42 PM (IST)
जमिनीच्या एनए आदेशाची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी साठ हजार रुपयांची लाच घेणारा मंडल अधिकारी व तलाठ्यास मंगळवारी रंगेहाथ पकडण्यात आले.
Tuesday, September 19 AT 04:55 AM (IST)
खबरे पोलिसांचे कान आणि डोळे समजले जातात. त्यांच्या माहितीवरच पोलिसांनी अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. मात्र, अलिकडे तंत्रज्ञानाचा वाढता वापर, खबऱ्यांचे वाढलेले भाव, मिळणारा अपुरा निधी अशा विविध कारणांमुळे हेच कान आणि डोळे पोलिसांपासून दुरावत चालले आहेत. त्यामुळे अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. खबरे सांभाळण्यासाठी पोलिसांना मिळणारा सिक्रेट फंड वेळेवर मिळत नाही.
Monday, September 18 AT 07:02 PM (IST)
महावितरणच्या सेंट मेरी उपविभागांतर्गत सात हजार ७०९ वीजग्राहकांना ऑगस्ट महिन्याचे शून्य युनिटचे वीजबिल दिल्याप्रकरणी ‘जी नेक्स्ट सोल्यूशन’ या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबरोबरच काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. एजन्सीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्याने महावितरणच्या एका अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.
Monday, September 18 AT 07:00 PM (IST)
‘बोगस डिग्री’ असलेला व्यक्ती शिक्षण विभागाचा प्रमुख कसा असू शकतो, असा परखड सवाल करून राज्य सरकारने याचा विचार करावा, अशी सूचना माजी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांनी केली. शिक्षणाचा बाजार मांडलाय. त्याची थट्टा सुरू आहे. सरकार शिक्षणाबाबत गंभीर नाही असा आरोप करताना शिक्षणाच्या तक्रारी कोणाकडे करायच्या हेच कळत नाही, अशा शब्दांत पवार यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे नाव न घेता टीका केली.
Monday, September 18 AT 06:59 PM (IST)
पुण्यामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक उत्पादने बनविण्याची मोठी क्षमता आहे. त्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरने खास समिती स्थापन केली आहे. चेंबरला इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. तसेच, पुणे परिसरात अणू कार्यक्रमाशी संबंधित उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणीही चेंबरने सरकारकडे केली आहे, अशी माहिती ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Monday, September 18 AT 06:57 PM (IST)
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) पुणे आणि परिसरातील स्टार्टअप्ससाठी इन्क्युबेटरची उभारणी करण्यात येणार आहे. त्याद्वारे या नवउद्यमींना मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा एकाच छत्राखाली उपलब्ध होणार आहेत.
Monday, September 18 AT 06:55 PM (IST)
फॅमिली कोर्टाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होऊन महिना उलटला तरी अद्याप वकील आणि पक्षकारांसाठी पार्किंग खुले करण्यात आलेले नाही. सुरक्षेच्या कारणास्तव पार्किंग बंद आहे. मात्र आता पार्किंगसाठी पैसे मोजण्याचा घाट फॅमिली कोर्टातील वकिलांनी घातला आहे.
Monday, September 18 AT 06:54 PM (IST)
बँकेचे संचालक असतानाही बँकेला स्वतःच्या आणि फर्मच्या मालकीच्या जागा भाड्याने दिल्याप्रकरणी ‘शिवाजीराव भोसले सहकारी बँके’चे अध्यक्ष आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका रेश्मा भोसले यांचे बँकेचे संचालकपद रद्दबातल ठरविण्यात आले आहे. सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांनी वरील आदेश काढले.
Monday, September 18 AT 06:53 PM (IST)
‘आजकाल आपण पाहतो की राजकारणी बोलायला लागले की चॅनलवर बीप लावावे लागते. ते काय बोलतात हे सामान्यांना कळू नये याची खबरदारी घ्यावी लागते. असभ्य भाषा वापरणाऱ्या अशा बीपवाल्या राजकारण्यांची आज संख्या मोठी आहे,’ या शब्दांत माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सोमवारी राजकीय नेत्यांवर सडकून टीका केली.
Monday, September 18 AT 06:49 PM (IST)
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा येथील विवेकानंद आश्रमाला अचानक विरोध सुरू केल्यानंतर अडचणीत सापडलेले आगामी ९१ वे साहित्य संमेलन आता बडोद्याला होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सोमवारी बडोदा हे संमेलन स्थळ म्हणून जाहीर करून या वादावर पडदा टाकला. ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान आता बडोद्यातील मराठी वाङ्मय परिषदेला मिळाला आहे. संमेलनाध्यक्षांची घोषणा १० डिसेंबरला होणार आहे.
Monday, September 18 AT 06:48 PM (IST)
स्वच्छतेचे कागदी घोडे नाचविणाऱ्या राज्यातील प्रमुख सरकारी कार्यालयांपैकी पुण्यातील २० कार्यालयांत डेंगीच्या डासांनी ठाण मांडले आहे. बाजीराव रस्त्यावरील बीएसएनएल, सदाशिव पेठेतील विद्या परिषद, येरवड्यातील मेंटल हॉस्पिटल, स्वारगेटचे पीएमपीएल या ठिकाणी सर्वाधिक डेंगीच्या अळ्या, डास सापडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. २० सरकारी कार्यालयांपैकी ११ कार्यालयांना खटला दाखल करण्याबाबतच्या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.
Monday, September 18 AT 06:43 PM (IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१८ दरम्यान होणार आहे. दहावीची परीक्षा एक मार्च ते २४ मार्च दरम्यान होईल, अशी माहिती मंडळातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.
Monday, September 18 AT 06:41 PM (IST)
बाणेर रस्त्यावरील सकाळनगर बसथांब्यानजीकच्या टपरीवर चहा पिताना धक्का लागल्यानंतर झालेल्या वादात दोघांवर धारदार शस्त्रांनी वार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास घडली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
Monday, September 18 AT 05:30 PM (IST)
बारामतीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बाहेरून एजंटाचे काम करणाऱ्या कारभाऱ्यांनी आता थेट कार्यालयाच्या टेबल-खुर्चीपर्यंत मजल मारली आहे. कार्यालयात अधिकृत लिपिक बाजूला पडले असून सर्व कारभार एजंट करीत आहेत. एवढेच नव्हे; तर अधिकाऱ्यांचे ‘यूजर आयडी’ आणि ‘पासवर्ड’ही एजंटांकडे असल्याचे समोर आले आहे.