Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
Tuesday, September 19 AT 08:10 PM (IST)
महापालिकेने कारवाई केल्यानंतर दोन तासांत फेरीवाले पुन्हा रस्ते, फूटपाथवर बस्तान बसवतात. तसेच संध्याकाळी केलेल्या कारवाईनंतर रात्री उशिरा पुन्हा रस्ता अडवतात. त्यामुळे पादचारी, प्रवासी आणि नागरिकांना चालण्यास जागा मिळत नसल्याने पालिकेने आता रात्री साडेअकरा ते बारा वाजेपर्यंत कारवाईचा बडगा सुरू ठेवण्याचे ठरवले आहे.
Tuesday, September 19 AT 08:05 PM (IST)
पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे वाढलेला ओढा लक्षात घेता आता ही भुरळ पालिकेलाही पडली आहे. येत्या काळात पालिकेकडून १२ भूखंडावर नव्या शाळा बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यापैकी चार शाळांच्या बांधकामाचे कार्यादेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. पालिका बांधत असलेल्या बहुतांश शाळा मुंबई पब्लिक स्कूलच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमातूनच सुरू करण्याचा प्रस्ताव विचारधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Tuesday, September 19 AT 08:01 PM (IST)
मुंबईसह उपनगरात मंगळवारी वादळी वारा व धुवांधार पावसाने हजेरी लावून पुन्हा एकदा मुंबईकरांच्या मनात धडकी भरवली. ऑगस्टमधील प्रलयंकारी पावसाची पुनरावृत्ती करीत संध्याकाळी कार्यालयातून घरी परतणा‍ऱ्या नोकरदारांची त्रेधातिरपीट उडवली. मुंबईतल्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. संध्याकाळी तीन तासांत मुंबईत तब्बल २१३.४ मिमी इतक्या रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली.
Tuesday, September 19 AT 07:55 PM (IST)
ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावत सुमारे पाच कोटी रुपये किमतीचे चार फ्लॅट आणि ३० लाख रुपये बळकावल्याप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसह त्याच्या दोन साथीदारांना ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतली बांधकाम व्यावसायीक तसेच सराफांकडूनही या टोळीने खंडणी उकळल्याचा संशय असून त्याबाबतचा तपास सुरू आहे.
Tuesday, September 19 AT 07:50 PM (IST)
मुंबईत तारांकित हॉटेल उभारणीसाठी किमान भूखंड क्षेत्राची अट विकास नियंत्रण नियमावलीमध्ये होती. तथापि आता ही अट काढून टाकण्यात आली आहे. बृहन्मुंबई क्षेत्रासाठी एकूण तीन चटई क्षेत्र निर्देशांकाच्या मर्यादेतील तारांकित हॉटेलच्या प्रस्तावास भूखंड क्षेत्राची किमान अट लागू राहणार नाही, असे बदल मुंबईसह राज्यातील महापालिका, नगरपालिका व प्रादेशिक विकास योजनांच्या विकास नियंत्रण नियमावलीत करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली.
Tuesday, September 19 AT 07:45 PM (IST)
कुणाला संरक्षण हवे असल्यास त्यांनी खासगी सुरक्षारक्षक नेमावेत, पोलिस हे खासगी सुरक्षारक्षक नाहीत. स्वतःच्या सुरक्षेसाठी सरकारी तिजोरीतील पैशांचा अपव्यय का करायचा, असे सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला.
Tuesday, September 19 AT 07:33 PM (IST)
तामिळनाडूतील जल्लीकट्टूपाठोपाठ महाराष्ट्र, कर्नाटकात बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी विधेयक मंजूर झाले आहे. तामिळनाडू, कर्नाटकात शर्यती सुरू झाल्या असताना महाराष्ट्रात त्या का सुरू झाल्या नाहीत, असा सवाल अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने मंगळवारी उपस्थित केला.
Tuesday, September 19 AT 07:28 PM (IST)
देशाच्या किनारपट्टीलगतच्या भागाचा सर्वंकष विकास करण्यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या सागरमाला कार्यक्रमाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, राज्यातील सागरमाला प्रकल्पांसाठी ५० टक्के निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या आठ प्रकल्पांसाठी ३५ कोटी ९० लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.
Tuesday, September 19 AT 07:22 PM (IST)
मध्य रेल्वेने पर्यटकांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा, यासाठी सेवेत आणलेल्या पारदर्शक डब्यास पहिल्या दिवशी ५० टक्के प्रतिसाद मिळाला. दादर-मनमाड जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडलेल्या या विशेष डब्यातील ४० आसन क्षमतेपैकी २० जागा भरल्या गेल्या. या डब्यासाठी नियमित सेवेपेक्षा जास्त दर असल्याने प्रतिसाद कमी असल्याचा सूर आहे. मात्र, साप्ताहिक आणि मोठ्या सुट्ट्यांमध्ये त्यास मोठा प्रतिसाद लाभेल, असा विश्वास रेल्वे अधिकारी व्यक्त करत आहेत.
Tuesday, September 19 AT 07:18 PM (IST)
परदेशातून आलेली हजारो रुपयांची मेमरी कार्ड चोरी केल्याप्रकरणी सहार पोलिसांनी कार्गो कंपनीच्या ३० वर्षीय चालकाला अटक केली आहे. मोहम्मद ताज मोहम्मद खान असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याजवळून पोलिसांनी जपान आणि चीनहून आणण्यात आलेले मेमरीकार्डचे दोन बॅाक्स हस्तगत केले आहेत.
Tuesday, September 19 AT 07:14 PM (IST)
‘मुंबई मेट्रो-३’च्या कामासाठी रात्रीच्या वेळेत अवजड वाहने व अवजड मशीनची वाहतूक करू देण्याची मुंबई मेट्रो रेल महामंडळाची (एमएमआरसीएल) विनंती मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्टपणे फेटाळून लावली. त्यामुळे रात्रीच्या वेळेत मेट्रोच्या कामासाठी आवश्यक अवजड मशीन, साहित्यांची वाहतूक करणे ‘एमएमआरसीएल’ला आता शक्य होणार नाही.
Tuesday, September 19 AT 07:08 PM (IST)
मुंबई विद्यापीठात सुरू असलेला निकाल गोंधळ आता संपत आला असताना एमएससीच्या प्रवेश गोंधळाने विद्यार्थी हैराण झाले आहेत. या अभ्यासक्रमासाठी ६० जागांसाठी २१६ अर्ज आले आहेत. निकाल उशिराने लागल्याने विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठांची दारे बंद झाली असल्याने यंदा या प्रवेशासाठी जास्त अर्ज आल्याचे दिसून आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आता जागा वाढविण्याची मागणी केली आहे.
Tuesday, September 19 AT 07:04 PM (IST)
म्हाडाच्या यंदाच्या लॉटरीत घरांची संख्या कमी असल्यामुळे अत्यल्प उत्पन्न गटातील इच्छुकांमध्ये नाराजी असली तरी श्रीमतांसाठी मुंबईतल्या मोक्याच्या जागेवर बांधलेल्या कोट्यवधींच्या घरांवर उड्या पडण्यास सुरुवात झाली आहे. लोअर परळच्या सर्वांत महागड्या घरांसाठी दोन दिवसांत २६, तर पवई व कांदिवलीच्या घरांसाठी तब्बल १०९ असे मिळून १३५ अर्ज आले आहेत.
Tuesday, September 19 AT 07:00 PM (IST)
गुरगाव येथील विद्यार्थी हत्येचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असून मुंबईतील पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या शाळांच्या सहलीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असल्याने विद्यार्थी सुरक्षेसाठी पालकांनीच एक पाऊल पुढे टाकले आहे. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालक प्रतिनिधीही सहलीत सहभागी होतील, असा प्रस्ताव आता पुढे येऊ लागला आहे.
Tuesday, September 19 AT 06:55 PM (IST)
आदर्श प्रकरणात आपल्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी म्हणजे लोकशाहीचा खून असल्याचा युक्तिवाद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या वतीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. आपल्याविरोधात खटला चालवण्यासाठी यापूर्वी राज्यपालांनी परवानगी नाकारली होती, पण राज्यात सत्ताबदल होताच ‘सीबीआय’ला परवानगी देण्यात आली, असा आरोप चव्हाण यांच्या वतीने करण्यात आला.
Tuesday, September 19 AT 06:51 PM (IST)
मुंबईत २९ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसात मॅनहोलमध्ये वाहून गेलेले बॉम्बे रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी दादर पोलिसांनी पाचव्या आरोपीला अटक केली आहे. राज शिरपूरकर असे त्याचे नाव आहे.
Tuesday, September 19 AT 06:46 PM (IST)
दारूचे व्यसन आरोग्याला घातक असल्याचे डॉक्टरांकडून वारंवार सांगितले जात असले तरीही हा इशारा गांभीर्याने घेतला जात नाही. मद्यप्राशनामुळे होणाऱ्या यकृताच्या आजारामुळे भारतात दरवर्षी अडीच लाखांहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Tuesday, September 19 AT 06:36 PM (IST)
आमदार नितेश राणे राजकीयदृष्ट्या अजून अपरिपक्व आहेत. त्यांना राजकारणात अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे लोकप्रियतेसाठी त्यांनी बेछूट आरोप करू नयेत. सिंधुदुर्गातील आंदोलनानंतर त्यांची अटक टाळण्यासाठी मी काय केले, याची वाच्यता करण्यास मला भाग पाडू नये. अन्यथा त्यांची अडचण होईल, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी दिला.
Tuesday, September 19 AT 06:06 PM (IST)
प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता सुधारणे, आदिवासीबहुल जिल्ह्यांतील नवजात अर्भक मृत्यूदर कमी करणे आणि बंद पडलेल्या ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना पुनरु‌ज्जीवित करणे या तीन विभागांशी संबंधित कामे प्रभावीपणे करण्यासाठी मलेशियातील प्रशासकीय व्यवस्थेतील पेमांडू युनिटची कार्यपद्धती राबविण्यासाठी मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली.
Tuesday, September 19 AT 06:01 PM (IST)
महाराष्ट्रात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखांचे कर्ज माफ करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंत आहे. या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. बँकांनीसुद्धा वेळेत कर्जमाफीसाठीची सर्व माहिती, माहिती व तंत्रज्ञान विभागाला द्यावी, अशा सूचना पुन्हा नव्याने संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
Tuesday, September 19 AT 05:56 PM (IST)
२००८ मध्ये झालेल्या मालेगाव स्फोटातील दोन आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने पाच वर्षांचा सर्शत जामीन मंजूर केला आहे. तब्बल नऊ वर्षानंतर सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर द्विवेदी यांना न्यायालयाने हा दिलासा दिला आहे.
Tuesday, September 19 AT 05:52 PM (IST)
पेट्रोल आणि डिझेलचा भारतातील सर्वाधिक दर मुंबईत आहे. येथे पेट्रोल प्रतिलिटर ८० रुपये आणि डिझेल प्रति लिटर ६३ रुपये तसेच एलपीजी गॅस सिलिंडर ७८० रुपये असून याविरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी १० ते १२ आणि संध्याकाळी ४ ते ७ यावेळेत शहरातील प्रमुख ७० पेट्रोलपंपांवर ‘जागो मुंबईकर जागो’ जनजागरण आंदोलन करण्यात आले.
Tuesday, September 19 AT 05:46 PM (IST)
विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्नावर बोट ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली होती. त्यानंतर मंगळवारी याप्रश्नी मनसेने पुन्हा एकदा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
Tuesday, September 19 AT 05:39 PM (IST)
लोअर परळच्या येथील सुमारे ९७ वर्षे जुन्या वाणी चाळीचा विकास बीडीडी चाळींच्या धर्तीवर करण्याच्या दृष्टीने गृहनिर्माण विभागाच्या वतीने प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. या चाळीतील रहिवाशांना सुमारे ४०५ चौरस फुटांचे घर मोफत देण्याच्या दृष्टीने आखणी सुरू झाली आहे.
Tuesday, September 19 AT 05:32 PM (IST)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची कामाला गती देण्याचे फडणवीस सरकारने ठरविले आहे. अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यत आली आहे. घाटकोपर परिसरातील चिरागनगरात अण्णाभाऊंचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात येणार आहे.