Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

१९९३ बॉम्बस्फोट: अबू सालेम, करीमुल्लाहला जन्मठेप

Maharashtra Times
Thursday, September 07, 2017 AT 03:18 AM (IST)
मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दुसऱ्या टप्प्याचा निकाल तब्बल २४ वर्षानंतर लागला. या बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरलेला कुख्यात गुंड अबू सालेम आणि करीमुल्लाह याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच या दोघांना प्रत्येकी दोन लाख रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. विशेष टाडा न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणातील एक आरोपी मुस्तफा डोसा याला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर काहीच दिवसांनी त्याचा मृत्यू झाला होता. त्यालाही या प्रकरणात दोषी ठरविण्यात आलं होतं.
१९९३ बॉम्बस्फोट: अबू सालेम, करीमुल्लाहला जन्मठेप