Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

निरोप देतो देवा! लाडक्या बाप्पाचे आज विसर्जन

Maharashtra Times
Monday, September 04, 2017 AT 07:00 PM (IST)
प्रसादाचा खमंग दरवळ, फुलांची देखणी आरास, धूप-अगरबत्तीचा भारावून टाकणारा वास, आरतीचे मंगल बोल यांनी गेले दहा दिवस वातावरण भारून गेले होते. मात्र, घरोघरी पाहुणचार घ्यायला आलेले गणपतीबाप्पा आज, मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांच्या घरी परतणार आहेत.