Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

निंबोडी शाळा दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

Maharashtra Times
Thursday, August 31, 2017 AT 12:45 PM (IST)
अहमदनगर तालुक्यातील निंबोडी येथील प्राथमिक शाळेची वर्ग खोली पडून तीन विद्यार्थ्याच्या मृत्य़ूप्रकरणी अखेर चौथ्या दिवशी गुरुवारी भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. शाळेचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, गटविकास अधिकारी, त्या काळातील ठेकेदार यांना आरोपी करण्यात आले. या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचे वडील प्रकाश पोटे यांनी फिर्याद दिली आहे.
निंबोडी शाळा दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल