Updated:
Subscribe News Letter Invite Friends

बुकगंगा प्रकाशित आणि नीतीन मोरे लिखित 'एकांताच्या वादळवेळा' ह्या पुस्तकाचे प्रकाशन...!!!

GlobalMarathi
Tuesday, November 15, 2016 AT 08:26 PM (IST)
बुकगंगा प्रकाशित आणि नीतीन मोरे लिखित 'एकांताच्या वादळवेळा' ह्या पुस्तकाचे प्रकाशन...!!!

"बुकगंगा प्रकाशित" आणि "नीतीन मोरे" लिखित "एकांताच्या वादळवेळा" या काव्यसंग्रहाचं प्रकाशन ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ व समीक्षक डाॅ रमेश धोंगडे यांच्या हस्ते १२ नोव्हेंबरला पुण्यात झालं. यावेळी मंचावर डाॅ धोंगडे, बुकगंगाच्या संचालिका सुप्रिया लिमये, मकरंद दातार आणि सुवर्णा बर्वे उपस्थित होत्या.आपल्या मनोगतात कवितासंग्रह विकले जात नाहीत याबद्दल खंत व्यक्त करताना नीतीन मोरे यांनी प्रकाशक म्हणून पाठराखण केल्याबद्दल बुकगंगाचे आभार मानले. "कविता हा माझा प्राण आहे. कवितेइतकं सहज आणि सरळ मला इतर काहीही करता येत नाही," असं ते म्हणाले.

सुप्रिया लिमयेंनी प्रकाशकांतर्फे मनोगत मांडलं. मोरे यांच्या "कवितासंग्रह विकले जात नाहीत" या मुद्दयाला खोडून काढत त्यांनी त्यांच्या "एकलकोंड्याचा कबिला" या पहिल्या काव्यसंग्रहाला बुकगंगावर चांगला प्रतिसाद असल्याचं सांगितलं.

डाॅ धोंगड्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात कविता आणि गीत या आकृतिबंधांची तुलना करत कवितेचं वेगळेपण विशद केलं. कविता लिहायला आणि समजून घ्यायला अवघड का असते याविषयी बोलून त्यांनी वाचकांनी कवितेच्या रसग्रहणाकरता प्रयत्न केला पाहिजे
                                 असं सांगतानाच कवींनी वाचकाला याबाबत उद्युक्त केलं पाहिजे असंही मत
मांडलं. नीतीन मोरे हे दिलीप चित्रे आणि अरूण कोलटकर यांच्या पुढच्या पिढीचे कवी आहेत असं म्हणत "आणखी काही वर्षांनी आपण मागे वळून पाहू तेव्हा हा मराठीतला एक मोठा कवी होता, असं आपल्या लक्षात येईल," असं भाकित त्यांनी केलं.

"एकांताच्या वादळवेळाच्या" प्रिंट व इ-बुकच्या प्रकाशनानंतर कवयित्री आश्लेषा महाजन यांनी नीतीन मोरे यांच्याशी "एकांताच्या वादळवेळा"वर गप्पा मारल्या. डाॅ मृणाल धोंगडे ह्यांनी मोरे यांच्या काही कवितांना त्यांनी लावलेल्या चाली स्वत: सादर केल्या. मोरे यांच्या कवितेचं रसग्रहण, त्यांची कवितेमागची भूमिका, कविता उत्स्फूर्त की संस्करण केलेली, कवितांची गाणी करताना संगीतकारासमोर येणारी आव्हानं असे विविध विषय यातून उलगडले. रसिकांना हा कार्यक्रम अतिशय भावला.

"एकांताच्या वादळवेळा" ह्या पुस्तकाची प्रिंट कॉपी किंवा ई-बुक खरेदी करण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.
http://www.bookganga.com/R/7DCHC