Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

निमित्त आमचा सहावा वाढदिवस...!!! म्हणजेच साहित्याची अखंड गंगा "बुकगंगा.कॉम" चा...!!!

Shravani
Monday, August 15, 2016 AT 01:40 AM (IST)
your Profile Photo
रहात असलो जरी परदेशी मी, मन माझे धाव घेते मायदेशी
देण्या आनंद वाचनाचा जगभरातील वाचकांस घेतला वसा “बुकगंगा.कॉम”चा मी...

ह्या ओळी सार्थ होतात आमचे सी.ई.ओ. मंदार जोगळेकर ह्यांच्यासाठी.
साखरपा सारख्या छोट्या गावात प्राथमिक शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी मंदार मोरेश्वर जोगळेकर ह्यांनी पुण्यास प्रस्थान केले आणि विद्यार्थी सहाय्यक समिती मध्ये राहून कमवा आणि शिका योजनेअंतर्गत आपले शिक्षण पूर्ण केले.

सुरुवातीपासूनच वाचनाची रुची असलेल्या मंदारने साहित्याचा प्रसार व प्रचार करण्याचा हेतू साध्य करण्यासाठी "बुकगंगा.कॉम" ह्या संकेतस्थळाची सुरुवात १५ ऑगस्ट २०१० रोजी केली. इथे वाचक सर्व प्रकाशकांची सर्व पुस्तके विकत घेऊ शकतात व ती घरपोच मिळवण्याची सुविधा बुकगंगाने उपलब्ध करून दिली. फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील वाचकांना सर्व प्रकारचे साहित्य वाचावयास मिळावे म्हणून बुकगंगा सर्व पुस्तके "ई-बुक" स्वरुपात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच वर्षभर दिवाळी अंक वाचकांना विकत घेऊन वाचता यावेत, संग्रही ठेवता यावेत यासाठी गेले ४ वर्षे बुकगंगाने "दिवाळी अंक" e -Magazine स्वरुपात आणले.

आजचे मोठमोठे लेखक, कवी यांच्या लेखनाला सुरुवात ज्या अंकापासून झाली अशा "वाड्.मयशोभा" ह्या अंकाच्या ५३ वर्षांतील सर्व अंकांचे डीजीटायझेशन "बुकगंगा.कॉम" ने करून हा खजिना सर्व वाचकांना उपलब्ध करून दिल. मुळचे साखरपा गावचे असणारे 'मंदार जोगळेकर' ह्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या गावातील मुलामुलींना तंत्रज्ञानाच्या मदतीने रोजगार उपलब्ध करून दिला. त्यासाठी गरजेप्रमाणे प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यातील टीमनेही वेळोवेळी सहकार्य केले. आणि आम्हा सांगण्यास आनंद होतो कि एका क्लिकवर विकत घेऊन वाचता येणारी ही “ई-बुक्स” ह्या साखरपा गावातच तयार होतात. इतकेच नव्हे तर ऑनलाईन ऑर्डर बरोबर फोनवरून ऑर्डर नोंदविता यावी तसेच ग्राहकांना त्यांच्या सूचना, शंका, आणि ऑर्डरविषयक प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळावे म्हणून रत्नागिरी येथे “कस्टमर केएर सेंटर” सुरु केले. सध्या तिथे २० जणांची टीम कार्यरत आहे.

दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा बुकगंगाचा प्रयत्न असतो तोच आगळावेगळा प्रयत्न दोन वर्षापूर्वी 'बुकगंगा.कॉम'ने "ऑनलाईन साहित्य संमेलन" घडवून केला. ज्याला लेखक, प्रकाशक आणि साहित्यप्रेमी ह्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.

साहित्याचा वारसा अखंड चालू ठेवण्याच्या उद्देश्याने, पुण्यातील नामवंत मंडळींनी आणि दिग्गजांनी नावाजेलेले डेक्कन जिमखाना पुणे येथे १९३१ पासून असलेले “इंटरनॅशनल बुक सर्विस” ह्या दुकानाचे पुनरुज्जीवन करण्याचे मंदारने ठरवले आणि “बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्विस” ह्या नावाने मार्चमध्ये सुरुवात केली. कॉलेजवयात ह्याच दुकानातील पुस्तक आपल्याला विकत घेऊन कधी वाचता येईल हे त्याचे छोटेसे स्वप्न ते दुकानच घेऊन पूर्ण झालेले पाहताना विशेष आनंद वाटतो.
 
यशाचे एक एक टप्पे गाठणाऱ्या बुकगंगाविषयी बोलताना मंदार जोगळेकर नेहेमी त्यांच्या पुणे, साखरपा, रत्नागिरी आणि अमेरीकेतील अशा १०० जणांच्या टीमला श्रेय द्यायला कधीही विसरत नाही. जरी मायभूमीपासून दूर असलो तरी मराठीशी जुळलेली नाळ आजही कायम आहे हे वाक्य त्यांनी सार्थ केले.

वाचनसंस्कृती जपण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी कार्यरत असलेली साहित्याची ही अखंड गंगा अशीच उतरोत्तर वाहत राहो आणि तुम्हा सर्व वाचकांचा आणि चाहत्यांचा शुभाशीर्वाद आम्हाला मिळो हीच प्रार्थना...!!!

श्रावणी...
निमित्त आमचा सहावा वाढदिवस...!!! म्हणजेच साहित्याची अखंड गंगा

प्रतिक्रिया
 
On 16/08/2017 03:32 PM श्रीकांत कोठे, पुणे said:
वर्धापन-दिनाच्या हार्दिक शुभेच्छया !!!

 
On 16/08/2016 12:11 AM Avinash Shridhar Limaye said:
' बुक गंगा डॉट कॉम ' 6 वया ब्धर्धापन दिनाच्या शुभेच्या.