Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

संमेलनाच्या निमित्ताने ऋणानुबंध दृढ

Mandar Joglekar - GlobalMarathi
Thursday, July 11, 2013 AT 04:07 AM (IST)
Tags: BMM,   BMM Adhiveshan

"नव्या बांधूया रेशीमगाठीजपण्याअपुली मायमराठी" ह्या बीएमएम अधिवेशनाच्या ब्रीदवाक्याची नाळ पकडत प्रमुखवक्तेवैज्ञानिक लेखक डॉ. बाळ फोंडके यांनी माणसामाणसांतील आणिमनामनांतील ऋणानुबंधांची उकल सहज सोप्या शब्दात करीत मराठी मनाबरोबरच जागतिक मनाचाठाव घेतला. आपपरभाव हा मानवी मेंदूच्या जडणघडणीतच असतो. आपले वागणे असे ठेवाज्याने आपभाव वाढीस लागतील आणि ऋणानुबंध वृद्धिंगत होतील हा संदेश त्यांनी आपल्याभाषणातून दिला. भारताबाहेरही इतक्या मोठ्या प्रमाणावर अधिवेशन आयोजित करीत असतानाकार्यकर्त्यांमधील प्रेमजिव्हाळाआपुलकी ही खरच वाखाणण्याजोगी असल्याचे त्यांनी नमूद केले. 

समृद्ध संगीत परंपरेची सुरेल झलक 'मेलान्ज' याकार्यक्रमात प्रसिद्ध गायक महेश काळे यांनी उलगडून दाखवली. धृपद, टप्पा, खयाल, तराणा, गझल, ठुमरी, सुफी, अभंग, नाट्यगीत, निर्गुणीभजने अश्या विविध संगीतप्रकारांचे दर्जेदार सादरीकरण त्यांनी केले. प्रसिद्धअभिनेत्री अश्विनी भावे यांनी निवेदनातून कार्यक्रम अधिक माहितीपूर्ण केला.

 

टोरांटो, कॅनडा येथील नरेंद्र दातार यांनी आपल्या शिष्य आणि साथीदारांसह स्वरगंधाहाभाव-भक्ती-नाट्य-चित्र गीतांचा कार्यक्रम सादर केला. शिकागो मराठी मंडळाने "वस्त्रहरण" हे नाटक सादर केले तर ह्युस्टनच्या वर्षा हळबेयांनी  कोमलरिषभाचे देणेसादर केले. न्यूजर्सी च्या कलाकारांचा "उभ्या उभ्या विनोद"तर टोरांटोच्या राजेंद्र दीक्षित यांचे गायन असे विविध कार्यक्रम इतर सभागृहातसादर झाले.

 

मुख्य सभागृहात सादर झालेल्या न्यूजर्सीच्या माधवी आणि प्रतिकदेवस्थळी यांच्या ४० तरुण कलाकारांच्या साथीत "खेळ मांडला" कार्यक्रमालाप्रेक्षकांनी विशेष दाद दिली.

 

सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांची प्रसिद्ध दिग्दर्शक विजयकेंकरे यांनी घेतलेली मुलाखत खूपच रंगली. आपल्या आजवरच्या प्रवासातील विविध आठवणी, मजेदारप्रसंग सांगत दर्जेदार गायन कलेचे सादरीकरण त्यांनी केले. छोटे सभागृहकमीपडल्यामुळे हाच कार्यक्रम रसिक प्रेक्षकांच्या  आग्रहाखातरपुन्हा सादर झाला.

 

 

- मंदार जोगळेकर

फिलाडेल्फिया, अमेरिका 

संमेलनाच्या निमित्ताने ऋणानुबंध दृढ
संमेलनाच्या निमित्ताने ऋणानुबंध दृढ
संमेलनाच्या निमित्ताने ऋणानुबंध दृढ
संमेलनाच्या निमित्ताने ऋणानुबंध दृढ
संमेलनाच्या निमित्ताने ऋणानुबंध दृढ
संमेलनाच्या निमित्ताने ऋणानुबंध दृढ
संमेलनाच्या निमित्ताने ऋणानुबंध दृढ