Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

बीएमएममध्ये संगीत, नृत्याबरोबरच क्रिकेटची फटकेबाजी !!

Mandar Joglekar - GlobalMarathi
Thursday, July 11, 2013 AT 04:12 AM (IST)
Tags: BMM,   BMM Adhiveshan

बीएमएम अधिवेशनाचे प्रमुख आकर्षण होते ते संगीतकार अजय-अतुल यांचीमुलाखत. मेधा महेश मांजरेकर यांनी अजय-अतुलला बोलतं करीत त्यांचा  आजवरचा प्रवास उलगडत नेला. संगीताचे कोणतेही शिक्षण नसतना केवळ जिद्दआत्मविश्वास आणि नाविन्याचीओढ या आपल्या उपजत कलागुणांच्या जोरावर त्यांनी संगीत क्षेत्रात आपला विशेष ठसाउमटवीला हे जाणून घेत उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले.अमेरिकेत येयला केवळ पुस्तकी ज्ञानाची गरज नसते तर आपल्या कलेच्या जोरावर सारे जगपादाक्रांत करीत रसिकमनांवर अधिराज्य गाजविता येते हे त्यांनी तरुण पिढीला दाखवूनदिले आहे. 

 


 

लंडनवरून आलेल्या डॉ. महेश पटवर्धन यांनी जोषपूर्ण गाण्यांनीप्रेक्षकांची दाद मिळविली. प्रसिद्धगायक ऋषिकेश रानडे आणि सावनी रविंद्र यांनीअजय-अतुलची पायाला ठेका धरायला लावणारी गाणी सादर करीत कार्यक्रमात रंगत भरली.अजय-अतुलनी नटरंग मधील "अप्सरा आली", "आता वाजलेकि बारा" अशा एकाहूनएक प्रसिद्ध गीतांचे बोल कसे कानात आले आणि त्यानंतर त्याबोलांवर, चालीवर गाणी कशी लिहून घेतली गेली त्याचे अनुभव कथन केले.


 

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अजय-अतुलच्या बरोबर कामकरीत असतानाचे किस्से सांगत कार्यक्रमात रंग भरला. शेवटी "कोंबडी पाळली","आता वाजले कि बारा" या गीतांवर ठेका धरीत, नाचतसाऱ्या प्रेक्षकांनी जल्लोष केला.

 

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमेरिकेतील विविध क्षेत्रात उल्लेखनीयकामगिरी केलेल्या मराठी लोकांना बीएमएम तर्फे पारितोषिके देऊन त्यांचा सत्कारकरण्यात आला. त्याचबरोबर उत्तर अमेरिकेतील लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन प्रमुखवक्ते, लेखक डॉ. बाळ फोंडके यांच्या हस्ते करण्यात आले. ही सर्व पुस्तकेबुकगंगा.कॉम वर उपलब्ध करण्यात आली आहेत. घाईघाईत उरकलेल्या या कार्यक्रमाची आखणीअधिक चांगल्याप्रकारे केली जावी अशी रास्त अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त केलीगेली.

 

संमेलनाच्या शेवटच्या दिवशी, भारतीयक्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांची मुलाखत  द्वारकानाथ संझगिरी यांनी मुख्य सभागृहात घेतली. आदल्या रात्रीउशिरापर्यंत चाललेल्या अजय-अतुलच्या कार्यक्रमामुळे सकाळच्या सत्रातील मुलाखतीला जास्त लोक येणार नाहीत अशी शंका असलेल्या दिलीपवेंगसरकरना अमेरिकेतील प्रेक्षकांनी  भरगच्च सभागृहातउपस्थित राहून आपल्या क्रिकेटवरील प्रेमाची प्रचीती दिली. गल्लीतल्या क्रिकेटपासूनसुरुवात करीत जगभर भारतीय संघाला क्रिकेट विश्वात मानाचे स्थान मिळवून देतानाआलेल्या अनुभवांचा मागोवा घेत, इतर देशातीलक्रिकेटपटूंच्या आठवणी सांगितल्या. जावेद मियांदादचा शेवटच्या चेंडूवरचा प्रसिद्धषटकार, वेस्टइंडीज गोलंदाजांची वेगवान गोलंदाजी अशा विविध प्रसंगांची आठवणचित्रफितीच्या माध्यमातून उलगडत जाताना मुलाखतीला वेळ कमी पडला. लिटल मास्टर सुनीलगावस्कर, अष्टपैलू कपिल देव आणि उच्यांकवीर सचिन तेंडूलकर अशा विविध भारतीयखेडाळूंच्या गंमती सांगत प्रत्यक्षात कर्नल नसूनही क्रिकेटच्या मैदानावरीलफिल्डमार्शल दिलीप वेंगसरकरांची मुलाखत संमेलनातील इतर कार्यक्रम पाहता अनोखीठरली.

 

संमेलनाच्या शेवटच्या सत्रात बहार आणली ती "युवांकूर" याधमाल डान्स, ड्रामा आणि कॉमेडीच्या कार्यक्रमाने. भारतातून प्रथमच अमेरिकेलाआलेल्या उमेश कामात, प्रिया बापट, सोनाली कुलकर्णी, अभिजीतखांडकेकर, अनिकेत विश्वासराव, भार्गवीचिरमुले, वैभव मांगले, अतिषा नाईक या प्रसिद्धकलाकारांनी. अतिशा नाईक व वैभव मांगले यांनी तुफान विनोदी नाटयछटा सादर करूनसाऱ्या प्रेक्षकांना मनसोक्त हसायला लावले. हसण्यासाठी पैसे पडणार नाहीत हे समजताचपुणेकर प्रेक्षकही दिलखुलास हसू लागले हे विशेष! पुण्यातील लग्नकार्यालयाच्याबुकिंगचा फार्स तर अप्रतिम. प्रिया बापट, सोनालीकुलकर्णी, भार्गवी चिरमुले यांनी सादर केलेल्या लावण्या तर अनिकेत विश्वासराव, उमेशकामात यांच्या बरोबर सादर केलेली गाणी खुपच सुंदर झाली. कार्यक्रमाचा सूत्रधारअभिजीत खांडकेकरने प्रेक्षकागृहातजात प्रेक्षकांना बोलते करीत कार्यक्रमाला रंगभरला. या सर्वांवर कळस चढविला तो वैभव मांगले यांनी नक्कलेसह सादर केलेलालतादीदींचा अविष्कार. त्या स्वर्गीय आवाजाने उपस्थित प्रेक्षकांना सोळा वर्षांपूवीबॉस्टनमध्ये भरलेल्या बीएमएम अधिवेशनाला आलेल्या लता मंगेशकरांची आठवण उजाळा देऊनगेली.

 

पुढच्या दोन वर्षांनी होणाऱ्या बीएमएम अधिवेशनाचा नारळकॅलिफोर्नियातील लॉस अ‍ॅंजेलिस मराठी मंडळाने घेतला आहे. सुमारे २००कार्यकर्त्यांनी फौज, अत्यंत मेहनतपूर्ण, आखीवरेखीवकार्यक्रमांची आखणी, अगत्यशील स्वागत आणि रुचकर जेवणाचा आस्वाद हे या अधिवेशनाचेवैशिष्ट्य.

 

- मंदार जोगळेकर

फिलाडेल्फिया, अमेरिका 

बीएमएममध्ये संगीत, नृत्याबरोबरच क्रिकेटची फटकेबाजी !!
बीएमएममध्ये संगीत, नृत्याबरोबरच क्रिकेटची फटकेबाजी !!
बीएमएममध्ये संगीत, नृत्याबरोबरच क्रिकेटची फटकेबाजी !!
बीएमएममध्ये संगीत, नृत्याबरोबरच क्रिकेटची फटकेबाजी !!
बीएमएममध्ये संगीत, नृत्याबरोबरच क्रिकेटची फटकेबाजी !!
बीएमएममध्ये संगीत, नृत्याबरोबरच क्रिकेटची फटकेबाजी !!