Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

१९३० सालानंतर पुन्हा "संगीत मानापमान" भारताबाहेर सादर

Mandar Joglekar - GlobalMarathi
Thursday, July 11, 2013 AT 03:59 AM (IST)

'नमन नटवरा’ या नांदीपासून सरू झालेल्या अमेरिकेतील बृहन महाराष्ट्र मंडळाच्या(बीएमएम) अधिवेशनातील प्रमुख आकर्षण असलेल्या संगीत मानापमान नाटकात प्रसिद्ध गायककलाकार राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वे यांनी सादर केलेल्या यानवल नयनोत्सवा’, ‘चंद्रिका ही जणू’, ‘देहाता शरणागता’, ‘शुरा मी वंदिले’,‘प्रेमसेवा शरण’, ‘रवी मी’, ‘युवती मनादारुण रण’, ‘मला मदन भासे’ अशा विविधअजरामर नाट्यपदांना प्रेक्षकांनी 'वन्समोअरचीदाद देत उत्स्फूर्त प्रतिदास दिला.

 

हे नाटक प्रथम काकासाहेब खाडिलकरांनी मार्च १९११ मध्ये रंगभूमीवरआणले होते. १०० वर्षानंतरही "मानापमान" नाटक बघताना ताजेतवाने वाटते. 

 

भामिनी ( प्रियांका बर्वे ) ही एका अती-श्रीमंत घराण्यातील मुलगी.धैर्यधर ( राहुल देशपांडे ) भामिनीच्या वडिलांच्या सैन्यातील सेनापती. भामिनीचेवडील बाबासाहेब यांची अशी इच्छा असते की भामिनी आणि धैर्यधर यांचे लग्न व्हावे. पणभामिनीच्या बहिणीला मुळीच असे वाटत नाही. तिला हवे असते की भामिनीचे लग्न एकामोठ्या श्रीमंत घरात व्हावे. त्यासाठी ति लक्ष्मीधर नावाच्या एका धनवान पणअती-भित्र्या माणसाला पसंतसुद्धा करते. पण भामिनी मात्र ह्या गोष्टीशी सहमत होतनाही. ती म्हणते कशी "खरा तो प्रेमा न धरी लोभ मनी".

 

धैर्यधर हा अतिशय पराक्रमी असा सेनापती असतो. तो नेहमीच शूरांचीपूजा करतो - यासाठी तो म्हणतो "शूरा मी वंदिले". लक्ष्मीधर भामिनीबद्दलधैर्यधरच्या मनात राग उत्पन्न करतो. बाबासाहेबांच्या सांगण्यावरून भामिनीधैर्यधरच्या छावणी शेजारील बागेत वनमाला नाव धारण करून रहायला जाते. तेथेच धैर्यधरतिला पाहतो आणि प्रेमात पडतो. शेवटी बाबासाहेब जेव्हा सांगतात वनमाला ही खरीवनमाला नसून भामिनी आहे तेव्हा धैर्यधरच्या मनातील भामिनीबद्दलचा राग निवळतो आणिते लग्न करतात व लक्ष्मीधरची फजिती होते.

 

"नाट्यसंगीत" या दोन शब्दांमधेमहाराष्ट्राच्या संगीताचा पूर्ण इतिहास दडलेला आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर, मास्टरदिनानाथ मंगेशकर, बाल गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, पंडित वसंतराव देशपांडे हीनुसती नाव ऐकूनच अंगावर काटा उभा राहतो, मग ह्यांनीगायलेल्या पदांचं तर विचारूच नका. अनेक नाट्यपदं आहेत ज्यांची गोडी कधी कमीच होतनाही. एक नाट्यसंगीत वेडा या नात्याने माझे वेडेपण इतरांपर्यंत पोहोचावे आणि त्यासोनेरी काळाने पुन्हा एकदा जन्म घ्यावा हीच इच्छा राहुल देशपांडे यांनी व्यक्तकेली. १९३० सालानंतर पुन्हा हे नाटक भारताबाहेर प्रथमच सादर होत असल्याचे त्यांनीआवर्जून नमूद केले.

 

या नाटकाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांनी केले होते तर राहुलदेशपांडे, प्रियांका बर्वे, अमेय वाघ, भक्तीप्रसाददेशमाने, नितीन धनडुके, सिद्धार्त मेनन, सायलीफाटक, दीप्ती माटे, सिद्धार्त महाशब्दे, भूषणमाटे या सर्व तरुण कलाकारांनी बीएमएम अधिवेशनाला उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.हार्मोनियम वर राजीव परांजपे आणि तबल्यावर निखिल फाटक यांच्या दर्जेदार साथीनेनाट्यगीतांची रंगत अधिकच वाढवली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेलीरंगमंच व्यवस्था नजरेत भरणारी होती.

 


- मंदार जोगळेकर

फिलाडेल्फिया, अमेरिका 

१९३० सालानंतर पुन्हा
१९३० सालानंतर पुन्हा

प्रतिक्रिया
 
On 20/11/2016 08:07 AM बालम said:
हे नाटक १९१० साली आस्तित्वात होते का?

 
On 03/04/2016 10:11 PM Avinash Shridhar Limaye said:
1930 चे संगीत मानापमान हे नाटक २०१६ पर्यंत म्हणजे गेली ८६ वर्षे , लोकप्रियतेच्या कळसावर राहिले हे मराठी रंगभूमीला खरेच भूशानावः आहे,त्यातून आपण मंडळींनी ते सात समुद्र पलीकडे नेलेत आपणाला भूशानावः आणि भारतीय रंगभूमीला अभिमानाचे नक्कीच आहे.

 
On 28/02/2015 02:39 a.m. vitthal ambhore jalna said:
Very nice . every part of the best of so good

 
On 30/11/2013 03:12 PM said:
खूप सुंदर

 
On 27/07/2013 12:03 PM dinesh omprakash atole said:
९५४५८५६४३८

 
On 12/07/2013 12:13 PM said:
नाटकाचे व पदांचे लेखन कोणी केले व संगित कोणी दिले हे महत्वाचे. लेखनातिल विषयामुलेच ते अमर होते. बाकी सर्व लोकांसमोर असतेच. म्हणून त्याचा उल्लेख व्हावा. - ज्योती कुंटे , मुंबई

 
On 11/07/2013 08:29 AM Vivek Khadpekar said:
यानिमित्ताने मानापमानाचे कथानक गवसले. आभार. मथळ्यात उल्लेखिलेला १९३० चा प्रयोग भारताबाहेर कुठे झाला होता त्याची माहितीसुद्धा मिळाली असती तर दुधात साखर पडली असती.