Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

बी.एम.एम. च्या १६व्या अधिवेशनाची शानदार सुरुवात

मंदार जोगळेकर - GlobalMarathi
Thursday, July 11, 2013 AT 03:52 AM (IST)
Tags: BMM Adhiveshan,   BMM

बृहन्महाराष्ट्र मंडळ (बी.एम.एम.) उत्तर अमेरिकेच्या १६व्याअधिवेशनाची शानदार सुरुवात प्रॉव्हिडन्स ह्या छोट्याश्याटुमदारशहरातील कन्व्हेंशन सेंटरमध्ये ५ जुलैला शानदार उद्घाटन सोहळ्याने झाली. न्यूइंग्लंड मराठी मंडळबॉस्टन आयोजित या संमेलनाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेतेदिग्दर्शकमहेश मांजरेकरप्रमुख वक्ते डॉ. बाळ फोंडकेन्यूयॉर्कमधीलभारतीय विदेश सेवेचे कॉन्सुल जनरल श्री. ज्ञानेश्वर मुळेबृहनमहाराष्ट्रमंडळाचे अध्यक्ष आशिष चौघुले आणि अधिवेशनाचे संयोजक बाळ महाले यांच्या हस्तेदीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आयोजक मंडळाच्या अध्यक्षा अदितीभिडे-टेलर यांनी दहा देशातून आलेल्या सुमारे तीन हजार मराठी उपस्थितांचे स्वागतकेले.

 

 

आपल्या उद्घाटनपर भाषणात महेश मांजरेकरांनी गेल्या तीन चार दशकातभारताबाहेर पडून विविध क्षेत्रात उल्लेखानिक कामगिरी करीत, मराठीचाझेंडा जगाच्या पाठीवर अभिमानाने फडकावीत असलेल्या मराठी बांधवांचे विशेष कौतुककेले. जगभराच्या कानाकोपर्‍यात राहूनही मराठी संस्कृतीची नाळ जोडणार्‍यासर्वजणांसाठी बी.एम.एम. अधिवेशन हे एक समान व्यासपीठ असल्याचे आशिष चौघुले यांनीनमूद केले. सुमारे  दोनशेहून अधिक हौशी आणि उत्साहीकार्यकर्त्यांचे पाठबळ ह्या अधिवेशनच्या आयोजनात असल्याचे संयोजक बाळ महाले यांनीनमूद केले.

 

अधिवेशनच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांचेबहारदार गायन झाले. उद्घाटनाच्या कार्यक्रमात न्यू इंग्लंड मराठी मंडळच्याकलाकारांनी, माय मराठीचा आजवरचा प्रवास नाट्य, नृत्यातूनसादर केला. टाळमृदुंगाच्या साथीत आणि विठ्ठलनामाच्या गजरात काढलेल्या दिंडीने, अमेरिकेतीलभक्तगणांची आषाढीची वारी मनोभावे पंढरीच्या विठ्ठलापर्यंत नक्कीच घेऊन गेली.  

 

पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या २१ अजरामर अवीट गाण्यांवर साकारलेली"स्वरगंगेच्या काठावरती" ही संगीत नृत्यनाट्यमय प्रेम कहाणी उपस्थितांनाविशेष भावली. फिलाडेल्फियाच्या डॉ. मीना नेरुरकर यांनी या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शनकेले होते. न्यूजर्सी, फिलाडेल्फिया परिसरातील सुमारे ४० कलाकारांनी यात भाग घेतला होता.

 

अद्वैत दादरकर लिखित, विजय केंकरेदिग्दर्शित 'फॅमिली ड्रामा' हे नाटक दुपारच्या सत्रातसादर झाले. सुकन्या कुलकर्णी, अजित भुरे, अद्वैतदादरकर, निखिल राउत, भक्ती देसाई यांनी भावनिक नात्यांची छान गुंफण उलगडून दाखवतप्रेक्षकांना या 'फॅमिली ड्रामा' मध्ये छान रंगून ठेवले.

 

पहिल्या दिवसाच्या रात्रीच्या सत्रात बी.एम.एम. सारेगम स्पर्धेचीअंतिम फेरी पार पडली. अमेरिकेतील सुमारे २०० कलाकारांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेतूनअंतिम फेरीत प्रतिभा दामले

, समिधा जोगळेकर, रवी दातार, अक्षयअणावकर, प्रसन्न गणपुले आणि श्रेयस बेडेकर यांची निवड झाली होती. अमेरिकेतवाढलेल्या या युवागायकांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. अंतिम फेरीतपरीक्षकांचे काम पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर आणि राहुल देशपांडे यांनी केले.परीक्षक आणि प्रेक्षकांच्या एसएमएस निवडीतून रवी दातारला प्रथम, समिधाजोगळेकरला द्वितीय तर अक्षय अणावकरला त्रितीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.भारतातील सारेगम स्पर्धेतील प्रसिद्ध वाद्यवृंद कलाकार खास भारतातून या स्पर्धेतीलकलाकारांना साथ देण्यासाठी आले होते. 

 

तीन दिवस चालणाऱ्या अधिवेशनादरम्यान बिझनेस कॉन्फरन्स, डॉक्टर्सकॉन्फरन्स आयोजित केली आहे. मराठी युवकांसाठी स्पीड डेटिंग, स्नेहबंधन, कुकिंगक्लास असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

 

 

- मंदार मोरेश्वर जोगळेकर

फिलाडेल्फिया

बी.एम.एम. च्या १६व्या अधिवेशनाची शानदार सुरुवात