Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मुस्लिम समुदायाचे आरोपी त्यांच्यासाठी खास विशेष न्यायालये

Hemant Mahajan
Sunday, March 31, 2013 AT 12:31 AM (IST)
दहशतवादाला प्रोत्साहन देणारा एक घातक आणि विषारी निर्णय कॉंग्रेस पक्षाने घेतला आहे. देशात मुस्लिम समुदायाचे जे आरोपी दहशतवादाच्या गुन्ह्यात दोष नसताना पकडले गेले असतील, त्यांच्यासाठी खास विशेष न्यायालये स्थापन करण्याचा हा निर्णय आहे.

कसाब आणि अफजल गुरूला अनेक वर्षे बिर्याणी खाऊ घातल्यानंतर जनमताच्या रेट्यामुळे सरकारने त्यांना फासावर लटकविले. आता मुस्लिम गुन्हेगार वेगळे करून त्यांची सुटका सरकारच करणार आहे. जर, पुराव्याअभावी एखाद्या आरोपीवर गुन्हा शाबीत होऊ शकला नाही, तर तपास अधिकार्‍याला शिक्षा, त्या मुक्तता झालेल्या सन्माननीय आरोपीला नुकसानभरपाई, अशा उदार तरतुदी या नव्या विशेष न्यायालयाच्या अधीन राहणार आहेत.

हा प्रस्ताव किती घातक आहे, याची कल्पना विधिपालिका आणि पोलिस विभागाला येऊ शकते. पण, आपले गृहमंत्री आहेत ठोंबे! ‘सोनिया बोले अन् सुशील हाले’ अशी आपल्या गृहमंत्र्यांची अवस्था आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा नुकताच निकाल लागला. त्यातील काही आरोपींविरुद्ध पुरावा न सापडल्यामुळे ‘टाडा’ कोर्टाने त्यांना सोडून दिले होते. मग, तपास अधिकार्‍यांना दंडित करणार आहात का आणि जे सुटले त्यांना नुकसानभरपाईही देणार आहात का? दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारचा प्रस्ताव आणणे हा नीचतेचा कळसच म्हटला पाहिजे. सरकारने हे विसरता कामा नये की, गुन्हेगाराला कोणताही धर्म नसतो. त्याचा धर्म एकच असतो आणि तो म्हणजे गुन्हेगारी!

आपल्या संविधानात सर्वांना समान न्याय आणि सर्वांसाठी समान कायदा अशी तरतूद आहे. कुण्या विशिष्ट धर्माच्या लोकांसाठी वेगळी तरतूद करावी, असे म्हटलेले नाही. तरीही, डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाचा सर्रास अपमान करण्याची एकही संधी कॉंग्रेस सोडत नाही. शाहबानो प्रकरणात सरकारने अशाच प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बदलून, नवा कायदा करून देशातील कोट्यवधी मुस्लिम महिलांवर अन्याय केला होता. आता केवळ दहशतवादाचा आरोप असलेल्या मुस्लिमांसाठी विशेष न्यायालये स्थापन केली जाणार आहेत. त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. केंद्रीय अल्पसंख्यक कल्याण खात्याचे मंत्री के. रहमान खान यांनी या मागणीचे पत्र, होनहार गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पाठवून ही मागणी केली आहे. सुशीलकुमार तर एका पायावर तयारच! त्यांनी तत्काळ या प्रस्तावाला मंजुरीही देऊन टाकली. पण, अशी न्यायालये किती कालावधीत स्थापन केली जातील, हे त्यांनी सांगितलेले नाही.

कारण स्पष्ट आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय लागू करण्यासाठी सर्व राज्यांची संमती घ्यावी लागणार आहे. तशी संमती अनेक राज्ये देणार नाहीत, हेही कॉंग्रेसला ठाऊक आहे. मग असा प्रस्ताव कॉंग्रेसने का आणावा? कारण, त्यामागे नीच आणि विषारी विचार आहे. देशात लोकसभेच्या निवडणुका केव्हाही होऊ शकतात. मुलायमसिंग यादवांनी आपल्या राज्यातील ४०० मुस्लिम गुन्हेगारांना कोणतीही चौकशी न करता सोडून दिले आहे. मुलायम हे काही कॉंग्रेससोबत येणार नाहीत, हे स्पष्ट दिसत असल्याने, मुलायमला मात देण्यासाठी ही विशेष न्यायालयाची योजना पुढे आणण्यात आली आहे. या निमित्ताने कोण मुस्लिम दहशतवाद्यांच्या बाजूने आहे, अशी चर्चा रंगविण्याचा कॉंग्रेसचा नीच डाव आहे.

गैरकॉंग्रेसशासित राज्ये या प्रस्तावाला मान्यता देणार नाहीत, हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. काही अन्य राज्येही या प्रस्तावाला विरोध करतील. परिणामी हा प्रस्ताव पारित होऊ शकणार नाही. पण, या निमित्ताने देशभर चर्चा घडवून आणावी, काही मोजकी उदाहरणे समोर मांडण्यासाठी आपल्या हस्तकांना वाहिन्यांवर आणावे, ही तरतूद किती आवश्यक आहे, हे अरुंधती रायसारख्या बाईकडून वदवून घ्यावे, असा यामागे डाव दिसतो. यातून मुस्लिम समुदायाची सहानुभूती मिळवून, त्यांची मते कॉंग्रेसला कशी लाटता येतील, एवढा हा विषारी आणि घातक डाव आहे. एकीकडे मुस्लिम आणि दुसरीकडे अन्य सर्व धर्म, पंथ, संप्रदाय अशी विभागणी कॉंग्रेसने या नव्या प्रस्तावातून केली आहे. कॉंग्रेसला याचेही भान राहिले नाही की, आपण देशात सांप्रदायिकतेेची नवी विषपेरणी करीत आहोत. कॉंग्रेसने हे लक्षात ठेवले पाहिजे की, या प्रस्तावाचा सर्वांत मोठा फटका हा कॉंग्रेसलाच बसणार आहे.

दहशतवादाच्या गुन्ह्यांचा तपास करणे साधीसुधी बाब नाही, हे हेडकॉन्स्टेबल राहिलेल्या गृहमंत्र्यांना कसे कळणार? कारण, शिंदे यांनी एकच तपास केला आहे आणि तो म्हणजे गांधी परिवारातील सदस्यांचे पाय कुठे आहेत? आज सीबीआयसारख्या संस्था दहशतवादाचा तपास करण्यात अपयशी ठरतात, हे शिंदेंना माहीत नाही काय? मग सीबीआयला फासावर लटकवणार का? आज सुदैवाने देशातील दहशतवादी पथके (एटीएस) अतिशय उत्तम काम करीत आहेत. त्यांना अशा नीच प्रस्तावांमुळे मोकळेपणाने काम करता येईल का? शिंदेंनी हे सांगितले पाहिजे की, आतापर्यंत देशात जेवढे बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवाया झाल्या, त्यात सापडलेले लोक कोण होते? मग एखाददुसर्‍या आरोपीविरुद्ध गुन्हा शाबीत झाला नाही म्हणून तो जर सुटला, तर संपूर्ण तपास यंत्रणेला तुरुंगात पाठवणार आहात काय?

आज केवळ कॉंग्रेसच्या नालायकीमुळे आणि दुर्लक्षामुळे देशात प्रत्येक शहरापासून तर खेड्यापर्यंत पाकिस्तानला मदत करणारे छुपे हस्तक लपलेले आहेत. त्यांच्या मदतीनेच पाकिस्तानी अतिरेकी भारतात विध्वंस घडवीत असतात. यात नंतर पकडले गेलेले घरभेदी कोण आहेत, हे तर आपल्यालाही माहीत आहे. कसाब प्रकरणात तर आपण पाकिस्तानला अनेकदा खलिते पाठविली आहेत. मग, काही मूठभर लोकांच्या दबावाला बळी पडून आमच्या तपास यंत्रणांवर दडपण निर्माण करण्याचा अधिकार सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांना कुणी दिला? की, केवळ एका धर्माच्या लोकांना खुष करण्यासाठी संपूर्ण देशाला दहशतवाद्यांच्या हवाली करण्याचा कॉंग्रेसचा विचार आहे?

देशात सर्वाधिक ८५ हजार गुन्हेगार हे एकट्या उत्तरप्रदेशातील कारागृहात बंद आहेत. यात मुस्लिमांची संख्या मोठी आहे. मुलायम त्यांना सोडत आहे म्हणून आपणही त्यांची री ओढावी, ही दुष्ट कल्पना कॉंग्रेसच्या डोक्यात आलेली दिसते.

त्यापाठोपाठ नितीशकुमार यांच्या बिहारचा क्रम लागतो. मुस्लिम अनुनयात कोण पुढे, यासाठी मुलायम आणि नितीश यांच्याच जणू चढाओढ सुरू आहे. त्यावर मात म्हणून कॉंग्रेसचा हा खटाटोप आहे. मुलायम लोहियावादी आणि नितीश स्वत:ला जयप्रकाश नारायण यांचे वारस समजतात. कृती पाहिली, तर दोन्ही महापुरुषांच्या विचारांना काळिमा फासणारी! कॉंग्रेसच्या या विषारी खेळीला सर्व राज्यांनी आणि सुबुद्ध नागरिकांनी प्रखर विरोध केला पाहिजे. कारण, मुस्लिम एकीकडे आणि अन्य धर्मीय एकीकडे, अशी सरळ फूट पाडण्याचा, सांप्रदायिक सद्भावाला तडे देण्याचा घोर अपराध कॉंग्रेस करीत आहे. विषाची आणखी बिजे पेरणारी ही कृती, संपुआ अध्यक्षा सोनिया गांधी आणि थोर अर्थतज्ज्ञ, विचारवंत, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या संमतीनेच केली जात आहे.

भ्रष्टाचार आणि महागाईने त्रस्त झालेली जनता आपल्याला मते देणार नाही, ही धास्ती आतापासूनच कॉंग्रेसच्या मनात आहे. त्यासाठी मुस्लिम समुदायाची अधिकाधिक मते आपल्याकडे कशी ओढता येतील यासाठी मुलायम, नितीश आणि कॉंग्रेस यांच्यात चढाओढ लागली आहे. पण, याचा लाभ दहशतवाद्यांना होणार आहे. म्हणून, असा कोणताही कायदा देशातील जनता सहन करणार आहे का? सर्वांनी शांत डोक्याने विचार करण्याची गरज आहे.

मुस्लिम समुदायाचे आरोपी त्यांच्यासाठी खास विशेष न्यायालये

प्रतिक्रिया
 
On 03/07/2015 04:15 PM YSKE N.R. said:
कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता देशाच्या शेवेसाठी नसता अगोदर तो स्वतासाठी असतो ,मग देश -जनता याचा विचार करायला लागतो ,मग स्वर्थ साठी jatiybhedbhav काय अणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान काय ,आपण मालामाल होतोय ,निवडणुकीत गेलेला पैसे वसूल करतोय ,आपल्या पुडीला १० पिड्याचि वेवस्ता करतों व जनतेत माण पण मिळतोय अणि वरून देश अणि जनतेची शेवा करतोय ,म्हनुणतर म्हणतोय एवढा kala पैसा मन्र्त्यच्याच खात्यात कोठून येतोय?

 
On 20/05/2013 11:10 PM santosh said:
nalayakapana

 
On 01/04/2013 12:11 PM G M Makode said:
कॉंग्रेस मुस्लिम चे लाड पूर वीत आहे.

 
On 31/03/2013 02:18 PM arvind said:
कॉंग्रेस कडून वेगळी अपेक्षा करता येईल का? आत्तापर्यंत "अल्पसंख्यांकांचे हित " या नावाखाली समाजात फुट पाडणे हाच कॉंग्रेसने धर्म मानला. त्यामुळे राष्ट्र हिताला बाधा पोहोचते ह्याचा विचार करण्याचे अनावश्यक आहे असे त्यांचा स्वार्थी आणि संकुचित दृष्टीकोन. केवळ मतासाठी किती लाचारी पत्करायची.

 
On 31/03/2013 10:17 AM अमोल कोकणे said:
मायावतीने हेच केलं फक्त अल्पसंख्यांकांची मते गोळा करून CM बनली पण हे एक वेळ state lavel ला समजू तरी शकते पण मत मिळवण्यासाठी इतका नीचतेचा कळस कसा करावा ? ६५+ वर्षे झाली पण जातीवाद दूर करून आरक्षण हटउन एकसंध भारत उभा करणे सोडून देशात फुट पाडण्याचा प्रयत्न ? तोही सरकार कडून ? यांना देशद्रोही का म्हणू नये ? एकच प्रश्न विचारावासा वाटतो.. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?

 
On 31/03/2013 09:09 AM anamika said:
आता विचार करण्याची नाही....कृती करण्याची वेळ आली आहे...हिंदूंनो जागे व्हा..

 
On 31/03/2013 07:25 AM Jakartawala said:
ब्रावो, ब्रिगेडियर साहेब!