Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

उत्तर अमेरिकेतल्या चाहत्यांसाठी प्रथमच... संगीतकार अजय-अतुल @ B.M.M. !!

कौमुदी वाळिंबे
Sunday, March 31, 2013 AT 12:05 AM (IST)
जुलै २०१३ मध्ये होणार्‍या १६ व्या बी.एम.एम. अधिवेशनाला येणार्‍या मराठी रसिकांना अनोखी मेजवानी मिळणार आहे. संगीतकार अजय-अतुल या अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अमेरिकेतल्या रसिकांसमोर एक आगळा-वेगळा कार्यक्रम सादर करतील. या कार्यक्रमाद्वारे अजय-अतुल गोगावले बंधूंचा झपाटून टाकणारा जीवन आणि संगीतप्रवास उलगडणार आहे.

'वार्‍यावरती गंध पसरला, मन उधाण वार्‍याचे, कोंबडी पळाली' अशा एकाहून एक लोकप्रिय गाण्यांवर, अजय-अतुलच्या 'जोगवा आणि नटरंग'मधील गाण्यांनी कळस चढवला. साथसंगत, पार्श्वसंगीत, जाहिराती, नाटक आणि टीव्ही मालिका, याबरोबर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांच्या स्टाईलचा वेगळा ठसा उमटलेला आहे. केवळ मनात खोल रुजलेल्या संगीतप्रेमाच्या आणि उपजत गुणांच्या बळावर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आणि लखलखीत यश मिळवलं आहे.

आता हा सगळा जीवनपट आणि त्यांचं धुंद करणारं संगीत खुद्द अजय-अतुल बी.एम.एम.च्या रंगमंचावरुन सादर करणार आहेत. यामधे अजय-अतुलला बोलतं करण्याची जबाबदारी प्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी घेतली आहे. नाटक, टी.व्ही.मालिका आणि चित्रपटांतल्या या श्रेष्ठ अभिनेत्रीने नुकतंच चित्रपट-दिग्दर्शनही केलं. आता बी.एम.एम.च्या अधिवेशनात एक मुलाखतकार म्हणून त्या रसिकांसमोर येतील. तर आघाडीचे गायक हृषिकेश रानडे आणि सावनी रविंद्र याच कार्यक्रमात, अजय-अतुलची गाणी सादर करण्यासाठी त्यांच्या साथीला असतील.

आता बी.एम.एम.च्या अधिवेशनाद्वारे उत्तर अमेरिकेतल्या आणि जगभरातल्या रसिकांसाठी संजीवनी न्यूट्रास्यूटीकल अँड हेल्थ प्रॉडक्टस लिमिटेड आणि कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड यांनी हा वैशिष्टयपूर्ण कार्यक्रम प्रायोजित केला आहे. या कार्यक्रमाबद्दल बोलताना कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुजय कालेले म्हणाले, "सुप्रसिध्द संगीतकार अजय-अतुल यांच्याप्रमाणेच कोलते-पाटील समूहासाठीही महाराष्ट्रीयन संस्कृती हा जिव्हाळ्याचा विषय आहे. बी.एम.एम. २०१३ च्या सहयोगाने एक संगीत समारोह आयोजित करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे. यामुळे उत्तर अमेरिकेत राहणार्‍या मराठी बांधवांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक बंधांना नवा उजाळा मिळेल, असा मला विश्वास वाटतो."

येत्या जुलैमध्ये होणार्‍या बी.एम.एम. अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक आणि आर्थिक उपक्रम होत आहेत. याविषयीच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या
www.bmm2013.org 
www.facebook.com/bmm2013


कौमुदी वाळिंबे.
उत्तर अमेरिकेतल्या चाहत्यांसाठी प्रथमच... संगीतकार अजय-अतुल @ B.M.M. !!
उत्तर अमेरिकेतल्या चाहत्यांसाठी प्रथमच... संगीतकार अजय-अतुल @ B.M.M. !!
उत्तर अमेरिकेतल्या चाहत्यांसाठी प्रथमच... संगीतकार अजय-अतुल @ B.M.M. !!
उत्तर अमेरिकेतल्या चाहत्यांसाठी प्रथमच... संगीतकार अजय-अतुल @ B.M.M. !!