Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

बी.एम.एम. अधिवेशनात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल

कौमुदी वाळिंबे
Monday, February 18, 2013 AT 11:47 PM (IST)
बी.एम.एम. अधिवेशनाचा भरगच्च कार्यक्रम: आशुतोष गोवारीकर प्रमुख पाहुणे तर डॉ. बाळ फोंडके प्रमुख वक्ते

साहित्य-संगीत, नाट्य-चित्रपट, आणि क्रीडा अशा सर्व क्षेत्रातले मान्यवर आणि मातब्बर जुलै २०१३ मधे होणार्‍या बी.एम.एम. (बृहन्महाराष्ट्र मंडळ) अधिवेशनाच्या व्यासपीठावर झळकणार आहेत. या सर्वांची उपस्थिती निश्चित झाल्यानं, या १६ व्या अधिवेशनाच्या तयारीत चांगलीच रंगत आली आहे.विक्रमवीर' प्रशांत दामले यावेळी जरा वेगळ्या रुपात रंगमंचावर अवतरणार असून, या गायक-अभिनेत्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, ते खुल्या गप्पांमधून रसिकांसमोर येणार आहे. त्याचबरोबर, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर हेही मुलाखतीद्वारे रसिकांना सामोरे जाणार असून, सुप्रसिध्द स्तंभलेखक द्वारकानाथ संझगिरी त्यांची मुलाखत घेतील.

बी.एम.एम.च्या अधिवेशनात कोणतं नाटक येतं, याकडे अमेरिकेतील नाटकप्रेमी नजर लावून असतात. यावेळी सुकन्या कुलकर्णी, अजित भुरे, अद्वैत दादरकर आदींच्या भूमिका असलेलं, 'एकदंत क्रिएशन्स' निर्मित आणि विजत केंकरे दिग्दर्शित 'फॅमिली ड्रामा' रसिकांच्या भेटीला येत आहे. त्याबरोबर, यावर्षी रसिकांना संगीत-नाटकाचीही मेजवानी मिळणार आहे. राहुल देशपांडे यांनी पुनरुज्जीवित केलेलं 'संगीत मानापमान' यावेळी सादर होणार आहे. नव्या रुपातलं, नव्या संचातलं हे 'मराठी म्युझिकल' नव्या पिढीलाही आवडेल, अशी आयोजकांना खात्री वाटते.

बी.एम.एम. सारेगम २०१३ या संगीतस्पर्धेच्या अंतिम फेरीचा सोहळा या अधिवेशनात होणार आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्रिया बापट करणार असून, प्रशांत दामले हेही या सोहळ्यात 'स्पेशल गेस्ट' म्हणून सहभागी होतील.

येत्या जुलैमधे होणार्‍या बी.एम.एम. अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक आणि आर्थिक उपक्रम होत आहेत. याविषयी अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. तसेच तुम्हाला
फेसबुक पेजवर सतत नवनव्या घडामोडीविषयी माहिती मिळू शकेल.

कौमुदी वाळिंबे.
www.bmm2013.org
www.facebook.com/bmm2013
बी.एम.एम. अधिवेशनात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल
बी.एम.एम. अधिवेशनात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल
बी.एम.एम. अधिवेशनात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल
बी.एम.एम. अधिवेशनात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल

प्रतिक्रिया
 
On 25/02/2013 09:42 PM kishoremkakade said:
aal बेस्ट, हार्दिक शुभेच्या

 
On 21/02/2013 11:28 AM N.P. said:
yenyachi iccha aahe. Rahnyachi,- sarvasadharan Marathi mansala parvadnari - vyavastha kay asel he krupaya kalavave.

 
On 19/02/2013 11:18 PM चंद्रकांत कायरकर , पुणे. said:
बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन कोठे होणार आहे कृपया, कळवावे.

 
On 19/02/2013 06:29 AM RD said:
Looking forward to be in Boston for the next BMM Convention.