Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

श्यामची आई - साने गुरुजी

Mahanews
Tuesday, November 30, 2010 AT 03:38 PM (IST)
साने गुरुजींचे 'श्यामची आई` हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले, ते १९३५ साली. याचा अर्थ पुढच्या वर्षी हे पुस्तक प्रकाशित होऊन ७५ वर्षे होतील. याचाच अर्थ सन २०१० हे 'श्यामची आई` या पुस्तकाचे 'अमृत महोत्सवी` वर्ष आहे. सलग पंच्च्याहत्तर वर्षे एखादे पुस्तक लोकांच्या मनात रुतून बसणे, एवढेच नव्हे तर त्याच्या लाखाहून अधिक प्रती विकल्या गेल्यावरही, त्याची मागणी कायम राहणे, असे भाग्य एखाद्या पुस्तकाला क्वचितच लाभते.

असे काय आहे या पुस्तकात?

खरे तर हे पुस्तक आज मराठी माणसांच्या घराघरांत आहे. पुस्तक नसले, तरी त्याची कहाणी ही जवळपास प्रत्येक मराठी माणसाला ठाऊक आहे. ज्या कोणी ते वाचलेले नसेल, त्यांनी आचार्य अत्रे यांनी त्या पुस्तकाच्या प्रेमात पडून काढलेला 'श्यामची आई` हा चित्रपट तरी पाहिलेला असतो आणि त्यातील श्यामच्या आईची वनमालाबाईंनी उभी केलेली भूमिका आणि माधव वझे यांनी जिवंत केलेला श्याम हा त्यांच्या डोळ्यासमोर कायम उभा राहिलेला असतो.

'श्यामची आई` हा साने गुरुजींच्या बालपणीच्या आठवणींचा एक सोहळा आहे. अर्थात, याचा अर्थ गुरुजींच्या सार्‍याच आठवणी सुखद आहेत, असे मुळीच नाही. उलट गुरुजींचे बालपण किती खडतर अवस्थेत गेले, त्याचीच एका अर्थाने ही 'कथामाला` आहे. पण गुरुजींच्या मनात त्या आठवणी सांगताना, त्याबद्दलची खंत बिलकूलच नाही. उलट त्या खडतर काळातही आईने लहानग्या श्यामवर केवळ प्रेमाचाच वर्षाव केला, असे नाही तर उलट कोणत्याही खडतर प्रसंगातून आपले चारित्र्य आणि शील अभंग राखून बाहेर कसे पडावयाचे याचेच त्यास शिक्षण दिले. 'श्यामची आई` ही एका अर्थाने एक संस्कार शाळाच होती. शाळा कसली, ते खर्‍या अर्थाने गुरुजींचे 'माझे विद्यापीठ`च होते.

स्वातंत्र्य आंदोलनात तुरुंगवासात गुरुजींनी या आठवणी जागवल्या. खुद्द गुरुजी लिहितात : 'दिवसा काम करावे आणि रात्री जगन्माता, भारतमाता व जन्मदात्री माता यांच्या विचारात रंगावे,` असे तेथे चालले होते. गुरुजींच्या तुरुंगातील अनेक मित्रांना या रात्री आवडल्या. ज्यांना गुरुजी आपले लिखाण वाचून दाखवीत, त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आणि त्यांच्याबरोबर गुरुजींच्या डोळ्यातूनही घळघळा पाणी वाहत असे.

अश्रू हा गुरुजींच्या सार्‍याच साहित्याचा एक अविभाज्य घटक आहे. कोणी त्यामुळे गुरुजींच्या साहित्याची संभावना रडके वा पळपुटे साहित्य अशा शब्दांत भलेही करोत त्यामुळे त्या साहित्याची महती कमी होणारी नाही. आचार्य अत्रे यांच्यासारख्या अत्यंत आक्रमक प्रकृतीच्या माणसालाही ती समजू शकली होती त्यामुळेच त्यांनी या आठवणींवर अत्यंत भावूक आणि मनाला हात घालणारा असा चित्रपट तर काढलाच, शिवाय 'मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र` असा डोळ्यात पाणी आणणारा लेख लिहून या पुस्तकाचे अजरामर स्थान मराठी वाचकांच्या लक्षात आणून दिले.

दररोज रात्री आश्रमातील आपल्या सहकार्‍यांना श्याम आईच्या या आठवणी सांगतो, असा फॉर्म गुरुजींनी या आठवणी शब्दांकित करताना निवडला आहे. एकूण ४२ रात्रींचा हा प्रवास आहे. कोकणातले दापोली परिसरातले श्यामचे घर, तेथील गरिबीचे पण अत्यंत प्रेमळ असे वातावरण, श्यामवर त्याच्या आईइतकेच प्रेम करणारे पण प्रसंगी वज्राहूनही कठोर होणारे त्याचे वडील, दुर्वांची आजी अशी अनेक पात्रे गुरुजींनी आपल्या भावमधूर शैलीत जिवंत करून सांगितली आहेत.

आई अर्थातच श्यामला मनापासून जीव लावणारी पण तीही शिस्तीचे धडे देताना वडलांइतकीच कठोर होणारी... कधी श्यामला आपल्या आईच्या या शिस्तीचा वा तिच्या कठोरपणाचा रागही येतो. पण पुढच्याच क्षणी आईच त्याला ते समजावून सांगते. हे सारेच कसे मनाचा ठाव घेणारे आहे. पुस्तकातील अनेक प्रसंग, उपकहाण्या, सुभाषितवजा वाक्ये किमान गेल्या पिढीतील लोकांच्या तरी मनात कायमचे घर करून बसली आहेत.

खरे तर आज ज्या प्रकारे आपल्याला जीवन जगावे लागत आहे आणि ते करताना जी नवी जीवनमूल्ये समाजात रूढ होऊ पाहत आहेत, त्यांच्याशी संपूर्ण विसंगत अशी जीवनशैली आणि जीवनमूल्ये या पुस्तकात आहेत. तरीही गेली सात दशके या पुस्तकाची महती कायम आहे. त्यामुळे त्याबद्दल आणखी काहीही सांगण्याची गरज नाही.
श्यामची आई पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

पुस्तके वाचण्यासाठी इथे क्लिक करा

श्यामची आई - साने गुरुजी

प्रतिक्रिया
 
On 31/03/2015 10:35 AM pranjali said:
Kup chan पुस्तक aahe

 
On 11/03/2014 01:53 PM shubham tupe said:
मनाला मोहून टाकणार हे पुस्तक आहे

 
On 11/03/2014 01:51 PM shubham tupe said:
मला या पुस्तकाचा अभिमान वाटतो हे पुस्तक वाचल्यावर डोळ्यांमधून अश्रू वाहतात या पुस्तक विषयी बोलेल तितके कमी आहे आपले जीवन हे पुस्तक वाचल्यावर फुलून निघते

 
On 25/12/2013 02:32 PM miss swati said:
sham and her mother this is book is very intresting and very sai . wonderful i like it . when i read this book i feel happy

 
On 29/11/2013 11:08 AM madhura said:
मला हे पुस्तक आवडले. हे पुस्तक खूपच छान आहे.

 
On 04/08/2013 11:17 AM jagruti said:
खूप चान आहे पुस्तक, पुस्तक वाचून अगदी डोळे भरून आले , अप्रतिम...................

 
On 04/08/2013 11:17 AM jagruti said:
खूप चान आहे पुस्तक, पुस्तक वाचून अगदी डोळे भरून आले , अप्रतिम...................

 
On 15/01/2013 04:15 AM sachin desai said:
खूपच सुंदर पालगड च्या शाळेतच मी शिकलो, तेथील साने गुरुजीच घर व परिसर यात आजही गुरुजींचा सहवास असल्यासारखा वाटतो ,ज्याला हृदय आहे तो श्यामची आई वाचून नक्कीच गहिवरेल

 
On 14/10/2012 06:32 PM minal said:
खूपच chaan aahe pustak

 
On 27/10/2012 11:58 AM aisha ansari said:
नो

 
On 02/10/2012 10:34 AM vikram said:
मला हे बुक खूपच आवडले ......

 
On 15/09/2012 06:12 PM Vaibhavi. said:
'Shyam' ani 'Shyam chi aai' both are so wonderful & 'HRUDAY-SPARSHI'...

 
On 02/06/2012 10:29 PM sudhakar said:
तसा श्याम ७५ वर्षात घडल नाही याचे खरे दुख आहे

 
On 02/06/2012 10:29 PM sudhAKAR said:
सलग पंच्च्याहत्तर वर्षे एखादे पुस्तक लोकांच्या मनात रुतून बसणे, एवढेच नव्हे तर त्याच्या लाखाहून अधिक प्रती विकल्या गेल्यावरही, त्याची मागणी कायम राहणे, असे भाग्य एखाद्या पुस्तकाला क्वचितच लाभते. याचाच अर्थ हे पुस्तक हृद्यस्पर्शी आहे आणि ते त्याच अनुभवी ताकतीतून लिहिलेले आहे .

 
On 02/06/2012 10:23 PM sudhakar said:
तसा श्याम ७५ वर्षात घडल नाही याचे खरे दुख आहे

 
On 13/03/2012 10:58 AM PADY said:
मस्त आहे ,डोळ्यात पाणी आले रे,

 
On 13/03/2012 10:56 AM NIMBU said:
छान आहे .खूप छान आहे .

 
On 16/09/2011 03:20 PM mona said:
Really this book is inspretion for us . "Aai" kharach kay aste . I like sane guruji's thought .

 
On 27/02/2011 11:25 AM santosh sadashiv kagale said:
this is stoory wandrfull

 
On 15/12/2010 12:27 PM shreepad said:
हे पुस्तक खूपच छान आहे . मला हे पुस्तक आवडले .BookGanga