Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

शिवप्रताप दिन

Abhishek Kumbhar
Wednesday, November 10, 2010 AT 04:12 PM (IST)
"मासाहेब, उद्या आम्ही खान भेटीला जाऊ. जगदंबा आमच्या पाठीशी आहेच पण काही बरं वाईट झाले तर आपले राज्य ..."
"शिवबा...........
"तुम्ही काळजी करू नका. जर तुमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर आम्ही समजून जाऊ कि आम्ही आधीपासूनच निपुत्रिक होतो म्हणून. पण आमच्यामुळे तुमचा धीर खचून जाता कामा नये "

जिथे पोरं मरणासाठी उभी केली जातात तिथे पोरं मेल्यावर सुद्धा जिवंत राहतात.

महाराजांनी जावळी मारली आणि विजापूरची आदिलशाही पार थरारून गेली. सह्याद्रीचा हा वाघ आता डोईजड झाला होता. ह्याचा बंदोबस्त करणे म्हणजे काळाची गरज झाली होती. म्हणून बड्या बेगमने भर दरबारात आवाहन केले - ''कोण? कोण जाईल सह्याद्रीच्या त्या गुहेत? कोण पकडेल त्या वाघाला?'' सगळ्यांची जुबान बंद, डोळे जमिनीचे वेध घेत, मुंड्या खाली झुकल्या होत्या. बडी बेगम आग ओकत होती," ऐसा कोई माईका लाल नही, ऐसा एक भी मर्द नही इस बिजापुर दरबार में?" उत्तर काही येत नव्हते. पानाचे विडे जसे होते तसे तबकात निपचित पडले होते.

"हम जायेंगे बेगम साहिबा" कोण? कोण? कोण? सगळ्यांच्या माना मागे वळत होत्या. नक्की आवाज आला कुणाचा?

तो तोच ज्याने फर्जंद शहाजी राजांना कैद केले.
तो तोच ज्याने संभाजी राजांना दगा करून मारले.
तो तोच ज्याची औरंगजेबला पकडण्यापर्यंत मजल गेली.
आडवा तिडवा धिप्पाड अंगाचा, प्रचंड बुरुजासारखा, जसा राक्षसी देहाचा तसाच राक्षसी मनाचा.
... अफजल खान

उचलला विडा, आणि कोसळला महाराष्ट्रावर.

रक्ताचा सडा शिंपून उभे केलेले शिवार हा भस्मासूर पायदळी तुडवत निघाला, देव फोडले, मंदिरे नासवली, बाटवली. आता शिवाजी बाहेर पडेल असा त्याचा डाव. पण राजे लवकर बाहेर येईनात. इकडे खानाने रयत मारावयास सुरवात केली.

महाराजांनी राजगड सोडला व प्रतापगड जवळ केला. तो मृत्यूला घाबरून म्हणून नाही, तर राजगड ते प्रतापगड हा स्वराज्याचा बहुतांश भाग राजांनी अफझलखानपासून वाचवला. त्यात तो परिसर अतिभयाण. प्रतापगडाला जाण्यासाठी त्यावेळी एकच वाट होती. ती म्हणजे रणतोंडीची वाट. ज्या वाटेवरून जाताना तोंड रडल्याखेरीज राहत नाही अशी ती वाट.

खानाने घाईने वाई जवळ केली. खानाचे चाळीस हजाराचे सैन्य वाईच्या पसरणी घाटात पसरले. खानने राजांना खलिता पाठविला. ''जान प्यारी असेल तर तुरंत शरण ये. नाहीतर बेमोत मारला जाशील.'' सक्त दमाची भाषा. महाराजांनी खलित्यास उत्तर पाठविले, अतिशय रसाळ भाषेत, ''तुम्ही तर आमच्या वडिलांच्या ठायी! आम्हाला तुमची फार भीती वाटते. तुम्हीच आम्हाला भेटायला या, म्हणजे आम्हाला जरा धीर येईल. राज्य आपलेच आहे.''

घोळून घोळून खानला आणला प्रतापगडावर. उभारला खानासाठी शामियाना. असा शामियाना की नक्षीदार, जडजवाहीर जडित, संपत्तीची लयलूट केलेला. इतका देखणा की बघावं आणि बघतच रहावं. असा शामियाना उभारायचं कारण म्हणजे खानाला संपत्तीची अशी लयलूट आवडते. ही सगळी संपत्ती बघून खान भुलतो.

घरात पाहुणे येणार असतील तर पाहुण्यांच्या आधी हजर आपण. पण इथे उलटे आधी खान आला. शामियान्यात का... तर खान शामियान्यात आला आणि त्याला शिवाजी पहिला दिसला तर त्याच्या डोक्यात राग राहणारच. त्यामुळे आधी खान शामियान्यात आला आणि हरवून गेला. भुलून गेला खान त्या शामियान्याची शोभा बघून. मानसशास्त्र आहे हे महाराजांचे. खान येऊन टेकला आणि मग महाराजांनी गड सोडला. खानाचा शामियाना महाराजांना व्यवस्थित दिसत होता. पण महाराज वरतून येताना मात्र खानाला दिसू नये, म्हणून गड सोडण्याची वेळ सुद्धा भर दुपारची. आले महाराज. सोबत दहा अंगरक्षक.

शामियान्याच्या अलीकडे येवून राजे थांबले. आपल्या वकीलास शामियान्यात पाठविले व सय्यद बंडास बाहेर जाण्यास सांगितले. कारण सांगितले की, ''शिवाजी राजे डरते है सय्यद बंडा से'' खानाचे मानसिक खच्चीकरण राजांनी केले (आता शिवाजी तर आपल्या नोकरालाच घाबरतो मग आपणास तर...) चढला खान हरभ-याच्या झाडावर. जगाने या डावाला गनिमी कावा मानला, पण आपण ह्यास शिवसूत्र मानले.

राजे शामियान्यात आले बातचीत झाली आणि गळाभेटीसाठी राजे आणि खान पुढे सरसावले. जकडले राजांना आपल्या बाहुत. झाला दगा. मारला खानाने खंजीर राजांच्या पाठीत, सदरा फाटला. चिलखत असल्यामुळे राजांना इजा झाली नाही. पुढे राजांनी चाल केली. घातला बिचवा पोटात आणि पापणी लवायच्या आत काढला खानचा कोथळा बाहेर. खान कलंडला. सय्यद बंडा राजांवर चाल करून आला पण जीवा महालेने त्याचा अचूक वेध घेतला.

खान स्वतःला सावरत शामियान्याच्या बाहेर जाऊन त्याच्या पालखीत पडला. खानाच्या भोयांनी पालखी उचलून पळण्याची लगबग सुरु केली पण... खानाला तोडीस तोड अशा धिप्पाड अंगाचा, एकाच वेळी अर्ध बकरं जागीच बसवणारा, चार पाय धरून घोडा उचलणारा, चिखलात रुतलेली तोफ एकटाच काढणारा, असा संभाजी कावजी समोर ठाकला. ओढले त्याने वार भोयाच्या पायावर, पालखी पडली. पुढचा वार झाला तो खानच्या मानेवर आणि स्वराज्यावर चालून आलेल्या संकटास गर्दीस मिळवले. 

खानाचा वकील कृष्णाजी भास्कर खानाची तलवार धरून जवळच उभा होता तो शिवरायांवर वार करता झाला. वार राजेंच्या डोक्याला चाटून गेला. महाराज थोडक्यात बचावले. आणि महाराजांनी एकाच वारात त्यालाही गर्दीस मिळविले.


- अभिषेक कुंभार.
शिवप्रताप दिन

प्रतिक्रिया
 
On 12/04/2013 01:50 PM वैभव सोल्कर said:
जय शिवराय...

 
On 14-04-2012 10:13 PM आकाश सूर्यवंशी said:
राजे तुम्ही पुन्हा जन्माला या

 
On 11/11/2011 09:34 PM Balmohan, USA said:
"जिथे पोरं मरणासाठी उभी केली जातात तिथे पोरं मेल्यावर सुद्धा जिवंत राहतात". हे वाक्य आजच्या आधुनिक जमान्यात दहशदवादी पालक वेगळ्या अर्थी खरे करून आहेत ते विसरून चालण्यासारखे नाही. कुठे ते थोर शिवाजीमहाराज, त्यांचे धीरोदात्त आईवडील व भारतीय संस्कृती आणि कोणताच बदल न घडलेली Islamic शिकवण?

 
On 11/11/2011 12:38 PM Ketan Chitnis said:
स्वराज्य निर्मितीसाठी महाराजांनी कायम तळहातावर प्राण ठेवले. या लोकनेत्यास लाख प्रणाम.

 
On 04/07/2011 06:23 PM VITTHAL S. DESHMUKH said:
महाराजान बदल काय सांगू सांगण्या साठी शब्द अपुरे पडतील महाराजान बदल तर एवढेच सांगतो "जालेत बहु होतील बहु पार तुज परिहा " कितेक झाले आणि कितेक होतील पण महाराजान सारखा महापुरुष पुन्हा होणार नाही. महाराजान च्या चरणी विनम्र अभिवादन जय भवानी जय शिवाजी .

 
On 04/07/2011 06:23 PM VITTHAL S. DESHMUKH said:
महाराजान बदल काय सांगू सांगण्या साठी शब्द अपुरे पडतील महाराजान बदल तर एवढेच सांगतो "जालेत बहु होतील बहु पार तुज परिहा " कितेक झाले आणि कितेक होतील पण महाराजान सारखा महापुरुष पुन्हा होणार नाही. महाराजान च्या चरणी विनम्र अभिवादन जय भवानी जय शिवाजी .

 
On 04/07/2011 06:21 PM VITTHAL S. DESHMUKH said:
महाराजान बदल काय सांगू सांगण्या साठी शब्द अपुरे पडतील महाराजान बदल तर एवढेच सांगतो "जालेत बहु होतील बहु पार तुज परिहा " कितेक झाले आणि कितेक होतील पण महाराजान सारखा महापुरुष पुन्हा होणार नाही. महाराजान च्या चरणी विनम्र अभिवादन जय भवानी जय शिवाजी .

 
On 22/02/2011 05:15 PM nikhil shinde said:
महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या तुम्हास माझा त्रिवार मनाचा मुजरा ...... !!!जय भवानी जय शिवाजी !!!

 
On 20/02/2011 07:54 AM rayat prabodhan sanstha(sadanand purav) said:
महाराज, का बरे आम्ही सर्व आपसात भांडतो. आपण दिलेली शिकवण जाणून बुजून विसरल्यामुळेच आजचे पानिपत होत आहे. एकजुटीने शक्ती, युक्ती आणि बुद्धी वापरली तर आपल्या मेहनतीने निर्माण झालेला महाराष्ट्र आणि हे स्वराज्य वाढेल व तेव्हाच आपणास समाधान होईल. आपणास मनाचा आणि मानाचा त्रिवार मुजरा. महाराज आपली स्मृती आजही आमचे रक्त उसळवते. आजही खंडोजी खोपडे आणि रांज्याचा हरामखोर पाटील समाजात आहेत. त्यांना अद्दल घडवावीच लागेल. जिजाऊ साहेबांना आणि महाराज साहेबांना देखील मानाचा मुजरा. जय भवानी

 
On 19/02/2011 11:46 PM सचिन चिटणीस said:
राजे फक्त आज तुमच्याच मुळे आम्ही हिंदू आहोत आपणास त्रिवार मानाचा मुजरा...........जय भवानी जय शिवाजी

 
On 19/02/2011 08:59 AM arun mhatre said:
तुझ्या मुळे इतिहास जागला तुझ्या पुढे हे नम्र कडे तुझ्या कीर्तीच्या कथा सांगण्या सह्य ठाकला जगापुढे

 
On 22/02/2011 05:16 PM nikhil shinde said:
मुजरा महाराज त्रिवार मुजरा .........

 
On 10/11/2010 05:20 PM kiran said:
मुजरा राजे मुजरा