Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
कवी भास्कर रामचंद्र तांबे
GlobalMarathi
Monday, October 25, 2010 AT 04:52 PM (IST)
भास्कर रामचंद्र तांबे यांचा जन्म ऑक्टोबर २७, १८७३ या दिवशी मध्यप्रदेशातील मुंगावली येथे झाला. १९३७ साली ते ग्वाल्हेर संस्थानाचे 'राजकवी' झाले. त्यांच्या कवितेचे मुख्य स्वरुप गीतांचे, भावगीतांचे राहिले. ते अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी होते. ब्राउनिंगच्या नाट्यात्मक एकभाषितांप्रमाणे त्यांनी मराठीमध्ये प्रामुख्याने नाट्यगीते लिहिली. त्यांच्या गीतपद्धतीची छाप रविकिरण मंडळातील कवी आणि बोरकर कुसुमाग्रजादी पुढील कवींवरही पडली. 'तांबे यांची समग्र कविता' या ग्रंथात त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.

त्यांच्या काही प्रसिध्द कविता -

    * जन पळभर म्हणतिल हाय हाय!
    * नववधू प्रिया मी बावरते
    * कळा ज्या लागल्या जीवा
    * मावळत्या दिनकरा
    * तिन्ही सांजा सखे मिळाल्या
प्रतिक्रिया
 
On 19/09/2011 04:59 AM Dileep Khedekar said:
लताने त्यांच्या सगळ्या कविता अमर केल्या.. वरील कवितांखेरीजा .."मधु मागसी माझ्या सख्या परी, निजल्या तान्ह्यावरी, कशी कालानागिनी ....अशा कितीतरी सांगता येतील. त्यांचा कविता गूढ होत्या व मृत्यू हि त्यांची पार्श्वभूमी होती. अत्यंत सुरेख कविता होत्या. .